चांगल्या आरोग्यासाठी उन्हाळ्यात ह्या पाच गोष्टी खाणे टाळा

74 0

उन्हाळ्याचा हंगाम सुरू होताच, जोरदार ऊन आणि गरम वारा यांनी लोक हैराण होऊन जातात. तापमानात वाढ झाल्यामुळे बऱ्याच लोकांना आरोग्य आणि त्वचेसंबंधित त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत आपल्या आहाराची विशेष काळजी घेणे फार महत्वाचे आहे, कारण आहार थेट आरोग्यावर परिणाम करतो. उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी, जेवढे पाणी पिणे आवश्यक आहे तितकेच अन्न आणि पेय याची काळजी घेणे देखील आवश्यक आहे.

हवामानानुसार आपला डाएट प्लान तयार केला पाहिजे आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगत आहे ज्या उन्हाळ्यात टाळल्या पाहिजेत.
या पदार्थांच्या सेवनापासून दूर राहा

♦ 1. जास्त मसालेदार पदार्थ खाऊ नका

मसाले पदार्थांची चव वाढवतात, परंतु ते लोकांच्या आरोग्यासही गंभीर नुकसान करतात. जास्त मसाले खाल्ल्याने जळजळ, पोटाच्या इतर तक्रारींची समस्या सुरु होते. यासह शरीराचे तापमानही वाढते.

♦ 2. मांसाहारी पदार्थांचे सेवन कमी करा

उन्हाळ्यात मांसाहारातील पदार्थांचे जास्त प्रमा सेवन करणे टाळा. गरम हवामानात मसालेदार ग्रेव्हीचे पदार्थ खाल्ल्याने शरीराचे तापमान देखील वाढते, ज्यामुळे सतत घाम येणे कमी होते. तसेच, डायजेस्टिव सिस्टम देखील बिघडते.

♦ 3. जंक फूड

उन्हाळ्यात जंक फूड खाण्याऐवजी हिरव्या भाज्या अधिकाधिक प्रमाणात खा. हिरव्या भाज्या शरीर आवश्यक पोषक तत्व पुरवतात, ज्यामुळे बऱ्याच रोगांपासून दूर राहण्यास मदत होते.

♦ 4. चहा आणि कॉफी

आपल्यापैकी बहुतेकजण दिवसाची सुरुवात एक कप चहा पिऊन करतात. परंतु चहा आणि कॉफी या दोघांमुळे शरीराचे तापमान वाढते. त्यातील कॅफिन शरीराचे निर्जलीकरण करते. म्हणूनच उन्हाळा सुरू होताच चहा आणि कॉफीपासून दूर रहा.

♦ 5. चीज सॉस

चीज हा असा पदार्थ आहे, जो बहुतेक लोकांना आवडतो. परंतु उन्हाळ्यात चीज कमीतकमी खाल्ले पाहिजे. वास्तविक, चीज सॉसमध्ये कॅलरींचे प्रमाण खूप जास्त आहे. त्याच वेळी, या हंगामात शरीराला अधिक पोषक आवश्यक आहे. म्हणून, आहारात पौष्टिक गोष्टींचा समावेश करा.

Share This News

Related Post

Gadar 2 Movie

सनी देओल आणि अमीषा पटेलचा गदर 2 रिलीजपूर्वीच अडकला वादाच्या भोवऱ्यात? काय घडले नेमके?

Posted by - June 9, 2023 0
मुंबई : बॉलीवूड (Bollywood) अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अमीषा पटेल (Ameesha Patel) यांचा बहुप्रतक्षित गदर 2 या सिनेमाचे…

कोकण रेल्वेचं 100% विद्युतीकरण पूर्ण ; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं कौतुक

Posted by - March 30, 2022 0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मिशन 100% विद्युतीकरण’ च्या उल्लेखनीय यशाबद्दल आणि शाश्वत विकासाचे नवे मापदंड स्थापित केल्याबद्दल कोकण रेल्वेचं अभिनंदन…

अंगारकी चतुर्थी निमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासून गर्दी, कसा करावा उपवास, पुजाविधी, गुळ आणि तिळाच्या लाडूचे विशेष महत्व

Posted by - January 10, 2023 0
पुणे : वर्षाच्या सुरुवातीलाच आलेल्या अंगारकी चतुर्थी निमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटे पासूनच गर्दी केली आहे. आज…

चतु:शृंगी देवी मंदिराच्या जीर्णोद्धार प्रकल्पाचे शनिवारी भूमिपूजन

Posted by - April 12, 2022 0
पुणे- चतु:शृंगी देवी मंदिराचा जीर्णोद्धार आणि परिसराचा कायापालट या प्रकल्पाचे भूमिपूजन जगद्गुरू शंकराचार्य विद्या नृसिंह भारती स्वामी (करवीर पीठ) यांच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *