महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आज आठ दिवस पूर्ण झाले मात्र तरीही मुख्यमंत्री पदाची निवड झाली नाही. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री निवडण्यासाठी गुरुवारी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी महायुतीतील नेत्यांची बैठक पार पडली या बैठकीला एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांच्यासह भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा उपस्थित होते.
या बैठकीत मुख्यमंत्री कोण भाजपकडेच राहणार असल्याचे निश्चित झाला असून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला नगरविकास आणि पीडब्ल्यूडी सारखी महत्त्वाची खाती देण्यात येणार आहेत तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अर्थ विभाग राहणार आहे.
दरम्यान बैठकीसंदर्भात आता समोर आलेल्या बातमीनुसार एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाऐवजी विधान परिषदेच्या सभापती पदाची मागणी अमित शहा यांच्याकडे केले असून विधान परिषद सभापती पद शिवसेनेला देण्याची मागणी केली आहे.
यासोबतच गृह आणि अर्थ खातेही एकनाथ शिंदे यांनी हवे आहे. दरम्यान, मुंबईत महायुतीची होणारी बैठकही रद्द झाली आहे. एकनाथ शिंदे दोन दिवसांसाठी आपल्या गावी निघून गेले आहेत. आता ही बैठक 1 किंवा 2 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे.