आमदार नोकरी महोत्सवात 940 तरुणांना नियुक्तीपत्र, 30 नामांकित कंपन्यांचा सहभाग

234 0

पुणे- कोथरूड भेलकेनगर येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच भारतीय जनता पक्षाचे कोथरूड मतदार संघाचे सरचिटणीस गिरीश भेलके यांच्या वतीने नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. आशिष गार्डन येथे पार पडलेल्या या महोत्सवात संपूर्ण जिल्ह्यातून नोकरी इच्छुक तरुणांनी सहभाग नोंदविला. आमदार नोकरी महोत्सवात 940 तरुणांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

या नोकरी महोत्सवाचे उदघाटन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गिरीश भेलके, गुणवंती भेलके आदी उपस्थित होते. या महोत्सवात 30.कंपन्यांनी सहभाग नोंदविला तसेच पुणे शहर पुणे जिल्ह्यातील सुमारे दोन हजार युवकांनी भाग घेतला. नियुक्तीपत्र मिळालेल्या तरुणांनी आयोजकांचे आभार मानले.

गिरीश भेलके म्हणाले, “कोविड मुळे अनेक युवकांना आपली नोकरी गमवावी लागली. लॉकडाऊन मुळे अनेक व्यवसाय बंद पडले. अशा कठीण परिस्थितीमध्ये एक खारीचा वाटा तसेच समाजाप्रती आपली बांधीलकी जपण्याच्या हेतूने या उपक्रमाचे आयोजन केले” या महोत्सवासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे मार्गदर्शन लाभले. .

गिरीश भेलके यांनी याआधी अनेक समोजोपयोगी तसेच विधायक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये मुलांसाठी लसीकरण शिबिर, अत्यल्प उत्पादन असणाऱ्या नागरिकांसाठी लसीकरण शिबीर, मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबीर, आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गौरव तसेच ऑनलाईन उखाणे स्पर्धा, जील्हास्तरीय कबड्डी स्पर्धा, रक्षाबंधनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा, मतदार नोंदणी अभियान, मोफत आधारकार्ड शिबिर अशा अनेक यशस्वी उपक्रमांचे आयोजन केले आहे.

Share This News
error: Content is protected !!