पुणे- जागतिक नेत्रदान नेत्रदान दिनाच्या पूर्वसंध्येला भोई प्रतिष्ठानच्या वतीने आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सफाई कर्मचारी बांधव आणि कचरावेचक भगिनी यांनी नेत्रदानाचा संकल्प करून एक स्तुत्य समाजासमोर निर्माण केला.
10 जून ,हा दिवस जागतिक नेत्रदान दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो .सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. रामचंद्र भालचंद्र यांच्या स्मृतीनिमित्त हा दिवस साजरा करण्यात येतो.
यानिमित्ताने सिंहगड रोड येथील सन सिटी परिसरात भोई प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सफाई कर्मचारी बांधव आणि कचरावेचक भगिनी यांनी नेत्रदानाचा फॉर्म भरून संकल्प केला. यावेळी भोई प्रतिष्ठानच्या प्रसार मोहिमेचे समन्वयक डॉ. मिलिंद भोई यांनी या बांधवांना नेत्रदान बद्दलचे समज गैरसमज याबद्दल मार्गदर्शन केले. त्यानंतर या बांधवांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.
भोई प्रतिष्ठानच्या नेत्रदान प्रसार मोहिमेअंतर्गत आत्तापर्यंत सुमारे सात हजार 300 जणांनी नेत्रदानाचे फॉर्म भरले असून यामध्ये सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. जयंत नारळीकर, संगीतकार प्यारेलाल, अभिनेते विक्रम गोखले, पद्मविभूषण डॉ. विजय केळकर, अर्थतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव ,अभिनेत्री अलका कुबल यांचा समावेश आहे.
आपुलकी या संस्थेचे अध्यक्ष समीर रूपदे व प्राजक्ता रुपये यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. नितीन कोलते, डॉ. विजय कुंभार ,डॉ. जीवन काळे, डॉ. सागर वर्धमान, डॉ.पंकजा आसावा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. सनसिटी रहिवासी संघ, पूना आय केअर यांनी या उपक्रमाचे आयोजन केले.