अभिनेत्री पूनम पांडे जिवंत! का पसरवली निधनाची अफवा? समोर आला आहे कारण

892 0

अभिनेत्री पूनम पांडेच्या कथित निधनाच्या बातमीने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. अचानक, 2 फेब्रुवारी रोजी सकाळी, इंस्टाग्रामवर एका पोस्टने पूनम पांडेच्या चाहत्यांना धक्का बसला होता.

खुद्द अभिनेत्रीने स्वतःचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पूनम पांडे हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

इंस्टाग्रामवर ‘नशा’ फेम अभिनेत्री पूनम पांडेने म्हटले, ‘तुम्हा सर्वांसोबत काहीतरी महत्त्वपूर्ण शेअर करणे मला भाग पडले – मी येथे आहे, जिवंत आहे. गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर मला झालेला नाही. परंतु दुर्दैवाने, हा आजार कसा टाळायचा? याबद्दल जागृती नसल्याने हजारो महिलांचा यामुळे बळी जात आहे. इतर काही कॅन्सरप्रमाणेच, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर पूर्णपणे टाळता येण्याजोगा आहे. मुख्य म्हणजे HPV लस आणि लवकर तपासणी चाचण्या करणे. या आजारामुळे कोणाचाही जीव जाणार नाही याची खात्री करण्याचे साधन आमच्याकडे आहे. गंभीर जनजागृतीने एकमेकांना सशक्त बनवूया आणि प्रत्येक स्त्रीला तो कसा टाळता येईल? याची माहिती दिली जाईल याची खात्री करूया. काय करता येईल याचा सखोल अभ्यास करण्यासाठी बायोमधील लिंकला भेट द्या. या आजाराच्या विनाशकारी प्रभावाचा अंत करण्यासाठी एकत्र प्रयत्न करूया असं म्हणत #DeathToCervicalCancer हा hashtag वापरला आहे.

Share This News

Related Post

‘या’ फोटोतील कलाकाराला ओळखलेत का ? बॉलिवूडचा आहे सर्वात एनर्जेटिक स्टार …!

Posted by - September 22, 2022 0
सोशल मीडियावर बऱ्याच वेळा अभिनेत्री आणि अभिनेत्यांचे लहानपणीचे फोटो व्हायरल होत असतात. सुंदर चेहरा हि कोणत्याही अभिनेता किंवा अभिनेत्रीची खास…
Adah Sharma

Adah Sharma : ‘द केरळ स्टोरी’फेम अभिनेत्री अदा शर्माचा अपघात; ट्विटरद्वारे दिली माहिती

Posted by - May 15, 2023 0
मुबई : ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) या सिनेमामुळे अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.…
Vanita Kharat

Vanita Kharat : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात झळकणार ‘या’ नव्या भूमिकेत

Posted by - October 13, 2023 0
मुंबई : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री वनिता खरात (Vanita Kharat) ही तिच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांचे मनोरंजन…

आलीय भट्टच्या ‘गंगुबाई काठियावाडी’चा ट्रेलर रिलीज (व्हिडिओ)

Posted by - February 4, 2022 0
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटचा आगामी चित्रपट गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचा ट्रेलर सध्या प्रदर्शित झालाय. या ट्रेलरला तुफान प्रतिसाद मिळतोय.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *