ज्येष्ठ अभिनेते विलास उजवणे यांचं निधन

2359 0

अभिनेते डॉ विलास उजवणे  यांचं निधन झालं आहे. वयाच्या ६१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही वर्षांपूर्वी त्यांना ब्रेन स्ट्रोक हा गंभीर आजार झाला होता. त्यावर त्यांनी मात केली होती. मात्र नंतर हृदयासंबंधी विकार झाल्याने पुन्हा त्यांची तब्येत खालावली होती. आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा आहे.

‘चार दिवस सासूचे’, ‘दामिनी’, ‘वादळवाट’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणाऱ्या डॉ. उजवणे यांनी वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिरारोड येथील एका खासजी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Share This News
error: Content is protected !!