आपल्या हटके आणि दिलखेचक अदांनी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर या सध्या बिग बॉसच्या घरामध्ये आहेत
बिग बॉस मराठी सीजन 5 मध्ये वर्षा उसगावकर दमदार खेळताना पाहायला मिळत आहेत. वर्षा उसगावकर या आपल्या अभिनयासाठी तेवढ्या प्रसिद्ध आहेत तेवढ्याच त्यांचं खाजगी आयुष्यही चर्चेमध्ये आहेत वर्षा उसगावकर यांची अभिनेते नितीन भारद्वाज यांच्यासोबत ची लव स्टोरी चांगली चर्चेत होती.
महाभारत या मालिकेच्या दरम्यानच नितीन भारद्वाज आणि वर्षा उसगावकर एकमेकांच्या प्रेमात पडले होते. ही मालिका संपल्यानंतर ही अनेक वर्ष नितीन भारद्वाज आणि वर्षा उसगावकर यांच्या प्रेमाच्या चर्चा रंगल्या होत्या त्याकाळी हे दोघेजण लग्न करणार असल्याचेही बोललं जात होतं.
पुढे अचानक नेमकं असं काय घडलं की ज्यामुळे नितीन भारद्वाज आणि वर्षा उसगावकर विभक्त झाले हे अजूनही गुलदस्त्यातच आहे