आज साजरा केला जातो ‘वर्ल्ड टेलिव्हीजन डे’; ‘हा’ आहे या मागचा इतिहास!

857 0

आज 21 नोव्हेंबर 2024 रोजी वर्ल्ड टेलिव्हिजन दिन साजरा केला जात आहे. टेलिव्हिजन हे एक अत्यंत प्रभावशाली माध्यम आहे, जे आपल्याला शिक्षण, मनोरंजन आणि माहिती मिळवण्याचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग देतं. सुरुवातीला ब्लॅक अँड व्हाइट टीव्ही असला तरी, आज स्मार्ट टीव्हीच्या युगात प्रवेश झाला आहे. प्रत्येक घरात टीव्ही आहे कारण तो केवळ मनोरंजनाचं साधन नाही, तर आपल्या रोजच्या आयुष्यातील ताज्या घडामोडी, बातम्या आणि महत्त्वाच्या माहितीची अद्भुत सुविधा देखील देतो.

आजही मोबाइल आणि इंटरनेटच्या युगात, अनेक लोकांना क्रिकेट सामना किंवा निवडणुकीचं कव्हरेज टीव्हीवरच पहायला आवडतं. 21 नोव्हेंबर रोजी वर्ल्ड टेलिव्हीजन डे साजरा केला जातो, ज्याचा उद्देश टेलिव्हिजनच्या महत्त्वाची जाणीव लोकांपर्यंत पोहोचवणं आहे. या दिवशी टेलिव्हिजनच्या माध्यमातून शिक्षण, बातम्या, मनोरंजन आणि जागतिक संवाद साधण्याच्या भूमिकेचं महत्त्व अधोरेखित केलं जातं.

दूरदर्शन आज जगभरात एक महत्त्वाचा मीडिया प्लॅटफॉर्म बनला आहे. याची सुरुवात 1996 मध्ये झालेल्या पहिल्या वर्ल्ड टेलिव्हिजन फोरमने केली होती. या फोरममध्ये टेलिव्हिजनच्या महत्त्वावर चर्चा झाली आणि त्यानंतर 21 नोव्हेंबरला वर्ल्ड टेलिव्हिजन डे म्हणून घोषित करण्यात आला. आजही विविध देशांमध्ये टेलिव्हिजनच्या महत्त्वावर चर्चा, सेमिनार्स आणि कार्यक्रम आयोजित केले जातात.

जागतिक दूरदर्शन दिन टेलिव्हिजनच्या माध्यमातून एकत्र येऊन शिक्षण देणं, जागतिक कनेक्टिव्हिटी साधणं आणि महत्त्वाच्या सामाजिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणं याचं प्रतीक आहे. आज टीव्ही एक अत्यंत शक्तिशाली माध्यम बनलं आहे, जे जगभरातील लोकांना एकत्र आणतं आणि त्यांना नवीन ज्ञान मिळवून देतं.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!