एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाची कहाणी दाखवणारा नवरा माझा नवसाचा हा सचिन पिळगावकर दिग्दर्शित चित्रपट 2004 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 20 वर्षांनी या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
पहिल्या भागामध्ये एसटीतून मुंबई ते गणपतीपुळे पर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला होता तर दुसऱ्या भागात कोकण रेल्वेने हा संपूर्ण प्रवास होणार आहे या चित्रपटातील पहिलं गाणं आज प्रदर्शित झालं असूनडम डम डम डम डमरू वाजे’ असं गाण्याचं नाव आहे. मराठी संगीत क्षेत्रातील लोकप्रिय गायक आदर्श शिंदेसह सचिन पिळगांवकरांनी हे गाणं गायलं आहे. तसंच रविराज कोलथरकर यांनी संगीतबद्ध केलं आहे.
गाण्यावर सचिन आणि स्वप्नील जोशी नाचताना दिसतायत. तर त्यांच्यासोबत सुप्रिया आणि हेमल इंगळेदेखील आहेत. 20 सप्टेंबर रोजी नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.