चौथ्या दिवशी ‘द साबरमती रिपोर्ट’ बॉक्स ऑफिसवर फेल

431 0

गेल्या काही वर्षांमध्ये देशातील महत्त्वाच्या घटनांवर आधारित अनेक सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. त्यातला एक सिनेमा म्हणजे ‘द साबरमती रिपोर्ट’, जो नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमावर खूप चर्चा झाली असली तरी, सिनेमाने अपेक्षेनुसार कमाई केली नाही.

15 सप्टेंबर रोजी विधान सभेच्या पार्श्वभूमीवर रिलीज झालेल्या या सिनेमाने पहिल्या दिवशी 1.25 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी ती थोडी वाढून 2.1 कोटींवर पोहोचली, आणि तिसऱ्या दिवशी 3 कोटींचा आकडा गाठला. पण चौथ्या दिवशी सिनेमाची कमाई पुन्हा घटली आणि फक्त 1.10 कोटींची कमाई झाली.

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेला हा सिनेमा गोध्रा कांडावर आधारित आहे. या घटनेवरून देशभरात मोठे राजकारण झाले होते. सिनेमात विक्रांत मेस्सी मुख्य भूमिकेत असून, रिद्धी डोगरा आणि राशी खन्ना यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. धीरज सरनाने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

आता पाहणं महत्त्वाचं ठरेल की, ‘द साबरमती रिपोर्ट’ सिनेमाला किती प्रतिसाद मिळतो आणि निवडणुकांच्या काळात या चित्रपटाला किती फायदा होतो.

Share This News
error: Content is protected !!