Tejashree Pradhan

Tejashree Pradhan: “मला पुन्हा लग्न करायचं आहे”, तेजश्री प्रधानने व्यक्त केली इच्छा

1272 0

मुंबई : मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधानने (Tejashree Pradhan) अभिनेता शशांक केतकरशी लग्न केले होते. मात्र, त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. त्यांच्यात वर्षभरातच घटस्फोट झाला. आता घटस्फोटानंतर तेजश्रीने पुन्हा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तेजश्री प्रधानने अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनात स्वतःची एक वेगळी जागा निर्माण केली आहे.

नऊ वर्षांपूर्वी तेजश्रीने ‘होणार सून मी या घरची’ मालिकेतील अभिनेता शशांक केतकरशी लग्न केले होते. प्रेक्षकांना तेजश्री आणि शशांकची ऑनस्क्रीन केमिस्ट्री जशी आवडत होती. तशी ऑफस्क्रीन देखील आवडत होती. मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. आता घटस्फोटाच्या ९ वर्षांनंतर तेजश्रीने पुन्हा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

तेजश्रीने पुन्हा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली असून होणाऱ्या नवऱ्यामध्ये कोणते गूण हवेत याचादेखील खुलासा केला आहे. “लग्नासाठी मला फार स्थळे येत नाहीत. मला कुटुंब आवडते. मला कुटुंब हवे आहे. मला लग्न करायचे आहे. लग्न करायचे आहे ही गोष्ट माझ्या एवढी डोक्यात होती की, वयाच्या 24-25 व्या वर्षी मी तो निर्णय घेतला. पण, मला आता माझ्या आयुष्यात सेट व्हायचे आहे. त्यामुळे योग्य स्थळ आणि जबाबदार मुलगा मिळाला की लगेच मी लग्न करण्याचा निर्णय घेईन. लग्न या शब्दाचा आदर करणारा, जबाबदार, शांत, माझी बडबड ऐकणारा मुलगा मला हवा आहे. कारण मला बोलायला आवडते. मी पार्टी करणारी मुलगी नाही, मला कुटुंबाबरोबर वेळ घालवायला आवडतो.” असे तेजश्री म्हणाली आहे.

Share This News
error: Content is protected !!