मुंबई : ‘सूर नवा ध्यास नवा – आवाज तरुणाईचा’ (Sur Nava Dhyas Nava) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. गोपाळ गावंडे हा या पर्वाचा विजेता ठरला आहे. यामुळे त्याच्यावर सर्व स्थरातून कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.
गोपाळ गावंडे ठरला ‘सूर नवा ध्यास नवा’चा महागायक
‘सूर नवा ध्यास नवा – आवाज तरुणाईचा’ या सहाव्या पर्वाचा ग्रँड फिनाले दिमाखात पार पडला. ‘आवाज तरुणाईचा’ या पर्वात अकोल्याचा गोपाळ गावंडे विजेता ठरला. कार्यक्रमाच्या उल्लेखनीय प्रवासात, गोपाळने उत्कृष्ट सादरीकरण व अपवादात्मक कामगिरी पाहायला मिळाली. स्पर्धेतील त्याच्या उल्लेखनीय प्रवासामुळे तो या पर्वाचा ‘महागायक’ ठरला.
‘सूर नवा ध्यास नवा – आवाज तरुणाईचा’ या पर्वात जुनी गाणी नव्या अंदाजात ऐकायला मिळाली. या नव्या प्रयोगाला प्रेक्षकांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभला. गोपाळ गावंडे याचा अतुलनीय आत्मविश्वास आणि संपूर्ण पर्वातील अपवादात्मक कामगिरीमुळे प्रेक्षकांच्या प्रचंड पाठिंब्यामुळे त्याला राजगायकाचा मान मिळाला. या कार्यक्रमाच्या महाअंतिम सोहळ्याला माधुरी दीक्षित, नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे या कलाकारांनी हजेरी लावली होती.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Japan Earthquake : जपान हादरलं ! भूकंपाचे एकापाठोपाठ 21 धक्के; थरकाप उडवणारा व्हिडिओ आला समोर
Navi Mumbai : केंद्र सरकारच्या नव्या कायद्यामुळे आक्रमक होऊन ट्रकचालकांनी पोलिसांना केली मारहाण
Bollywood Movie : : ‘या’ वर्षात बॉक्स ऑफिस गाजवणार ‘हे’ 6 मोठे चित्रपट
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा; म्हणाले …
Supriya Sule : ‘सुप्रियाताई 15 वर्ष अजितदादांमुळे निवडून आल्या..’ रुपाली चाकणकरांची टीका
Fixed Deposit Interest Rates : ‘या’ 5 बँकांनी ग्राहकांना दिलं न्यू ईयर गिफ्ट