मुंबई : सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर अभिनीत ‘श्रीदेवी प्रसन्न’ (Sridevi Prasanna) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्या अगोदर या सिनेमातील ‘श्रीदेवी प्रसन्न’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
‘दिल में बजी गिटार’ हे गाणं आऊट!
‘श्रीदेवी प्रसन्न’ या सिनेमाच्या माध्यमातून सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांची जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. येत्या 2 फेब्रुवारीला हा सिनेमा सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘श्रीदेवी प्रसन्न’ या फ्रेश चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल विमल मोढवे आणि लेखन अदिती मोघे यांनी केले आहे.
‘श्रीदेवी प्रसन्न’ मध्ये ‘हे’ कलाकार झळकणार
‘श्रीदेवी प्रसन्न’ या सिनेमात सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर मुख्य भूमिकेत आहेत. सुलभा आर्य, संजय मोने, वंदना सरदेसाई, शुभांगी गोखले, रमाकांत दायमा यांच्या सारख्या मातब्बर कलाकारांसोबत सिनेमात सिद्धार्थ बोडके, रसिका सुनील, समीर खांडेकर, आकांक्षा गाडे, राहुल पेठे, पल्लवी परांजपे, पूजा वानखेडे, सिद्धार्थ महाशब्दे, जियांश पराडे हे तरुण कलाकार देखील महत्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत.
चित्रपटाची कथा नेमकी काय आहे?
‘श्रीदेवी प्रसन्न’ या सिनेमाचं नाव नुसतं फिल्मी नाही तर याचं कथानकच टोटल फिल्मी म्हणावं लागेल. ‘लव एट फर्स्ट साईट’ चं स्वप्न मनात बाळगत प्रेमाच्या भन्नाट कल्पना विश्वात वावरणारा प्रसन्न,मॅट्रिमोनी साइटवर ‘श्रीदेवी’ या नावाच्या उत्सुकतेपोटी तिला रिक्वेस्ट पाठवतो आणि ती अॅक्सेप्ट देखील करते. या दोन टोकांच्या माणसांची मनं जुळतात की नाही,त्या दरम्यान नेमकं काय काय घडतं या कथानकाला ‘श्रीदेवी प्रसन्न’ चित्रपटाच्या माध्य मातून दिलेला फिल्मी तडका रसिक प्रेक्षकांचे 100 टक्के मनोरंजन करणार यामध्ये कसलीच शंका नाही.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Accident Video : घोडागाडी शर्यतीत ट्रॅकवर चारचाकी उलटली; अपघाताचा Video आला समोर
Viral Video : बैलगाडा स्पर्धेतील बैल उधळल्याने 4 जण जखमी
Shri Ram Chalisa : नित्य श्रीराम चालीसाचे पठण केल्याने होतात ‘हे’ मोठे फायदे
Ram Mandir : 22 जानेवारीच्या सार्वजनिक सुट्टीच्या निर्णायाविरोधात न्यायालयात याचिका दाखल
Ram Mandir : 22 जानेवारीला तुमच्या घरी कशाप्रकारे कराल श्रीरामाची पूजा
Bus Accident : नाशिकमध्ये प्रवाशांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात
Ram Mandir : कोण आहे कांबळे दाम्पत्य? ज्यांना महाराष्ट्रातून मिळाला रामलल्लांच्या महापुजेचा मान
Kangana Ranaut : ‘अयोध्या म्हणजे आपली व्हॅटिकन सिटी…’, कंगणा राणावतचे वक्तव्य
Amit Shah : भारत-म्यानमार सीमेवरील मुक्तसंचार बंद; गृहमंत्री अमित शाहांची मोठी घोषणा