‘लग्न हा विषय आमचा वैयक्तिक आहे’, असं नवी पिढी स्पष्टपणे म्हणू लागली आहे. यावर प्रभावी भाष्य करणारा मकरंद माने दिग्दर्शित सोयरिक चित्रपट 11 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सोयरीक’ या आगामी मराठी चित्रपटात नितीश चव्हाण आणि मानसी भवाळकर ही नवी जोडी प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे.
विजय शिंदे, शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. कुटुंबव्यवस्था हा आजही भारतीय संस्कृतीचा पाया आहे आणि लग्न हा कुटुंबव्यवस्थेचा कणा. लग्न ठरवण्याच्या, करण्याच्या आणि ‘निभावण्याच्या’ ठरलेल्या पारंपरिक चौकटी मोडून आपल्या पसंतीला प्राधान्य देत लग्न जुळवण्याकड़े आणि त्याबाबत बंधनं असू नयेत, असा विचार करणारी आजची जनरेशन आहे.
एकूणच या जनरेशनला साजेशी कथा असणारा सोयरीक सिनेमाला रसिक पसंती देतात का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.