Shreyas Talpade

Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका; रात्री उशिरा रुग्णालयात दाखल

1135 0

मुंबई : मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेला (Shreyas Talpade) गुरुवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला. त्याला रात्री तातडीने रुग्णालायत दाखल करण्यात आले आहे. वेलकम 3 चित्रपटाच्या शूटिंगनंतर घरी परतल्यानंतर त्याची प्रकृती बिघडली. श्रेयसला मुंबईतील अंधेरी भागात असलेल्या बेलेव्ह्यू रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

श्रेयस गुरुवारी सकाळी चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेला होता. दिवसभर काम आटोपल्यानंतर तो घरी आला होता. घरी येताच श्रेयसने पत्नीला अस्वस्थ वाटत असल्याचं सांगितलं. पत्नीने नेमकं काय होतंय विचारल्यावर त्याला काहीच सांगता आलं नाही. त्यानंतर अचानक प्रकृती जास्तच बिघडल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. श्रेयसवर एंजिओप्लास्टी सर्जरी करण्यात आली असून त्याची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरकडून सांगण्यात आले आहे.

श्रेयस तळपदे वेलकम 3 या आगामी चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये श्रेयस तळपदे यांच्यासह अक्षय कुमार,रवीना टंडन, दिशा पटानी, जॅकलीन फर्नांडिस, लारा दत्ता, सुनील शेट्टी, संजय दत्त, परेश रावल, अर्शद वारसी, तुषार कपूर, राजपाल यादव, जॉनी लीव्हर, किकू शारदा, कृष्णा अभिषेक, राहुल देव ही तगडी स्टारकास्ट असणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Loksabha News : लोकसभेत घुसण्यापूर्वी सागरने इंस्टाग्रामला शेअर केलेली ‘ती’ पोस्ट व्हायरल

Suspension of MP : सभापतींनी विरोधी पक्षाच्या 15 खासदारांचं केलं निलंबन

IPL Auction Live Streaming : 19 डिसेंबरला दुबईमध्ये पार पडणार आयपीएलचा लिलाव

Tope Vs Lonikar : राजेश टोपेंना बबनराव लोणीकरांकडून शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

Police News : दोन दिवसात प्रमोशन द्या नाहीतर…; हेड कॉन्स्टेबलच्या ‘त्या’ पत्राने पोलीस दलात उडाली खळबळ

Maratha Reservation : आणखी एक बळी ! मराठा आरक्षणासाठी छत्रपती शिवाजी‎ महाराजांच्या स्मारकासमोर तरुणाने उचलले ‘हे’ पाऊल

Pimpari Chinchwad Crime : पिंपरी – चिंचवड हादरलं! पतीच्या ‘त्या’ निर्णयामुळे पत्नीने दिली पतीच्या हत्येची सुपारी

Pune News : पुणे तेथे काय उणे ! पुस्तक महोत्सवात चीनचा ‘तो’ रेकॉर्ड मोडत पुणेकरांनी स्थापन केला नवा विश्वविक्रम

Loksabha Security Breach : संसद भवनाच्या घटनेनंतर 7 सुरक्षा रक्षकांचे निलंबन

Pune Fire : पुण्यातील लोणी काळभोर परिसरात फर्निचरच्या गोदामाला भीषण आग

Maharashtra Weather News : मुंबई गारठणार ! राज्यात ‘या’ दिवशी वाढणार थंडी

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!