बगळ्याची शिकार करणाऱ्या मुलांवर सयाजी शिंदे संतापले!

355 0

 

मराठी अभिनेते सयाजी शिंदे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. सयाजी शिंदे यांनी चित्रपटांमध्ये अनेक वेळा नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत मात्र खऱ्या आयुष्यात ते सकारात्मक काम करतात. आता सध्या त्यांच्या पोस्टमुळे ते चर्चेत आले आहेत.

सिने सृष्टीतील कलाकार नेहेमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतात. चाहते देखील त्यांच्या काही पोस्टवर सक्रियपणे प्रतिसाद देतात. सयाजी शिंदे यांनी सध्या एक व्हिडिओ शेअर करत खंत व्यक्त केली आहे. मुंबईतील एक धक्कादायक प्रकार या व्हिडियोच्या माध्यमातून जनतेसमोर आणला आहे. हा प्रकार घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर असलेल्या पालिकेच्या नव्या उड्डाणपुलावर होत असल्याचे सांगितले. हा प्रकार पाहून सयाजी यांना धक्का ही बसला आणि राग ही आला. त्यांनी हा सगळा प्रकार मोबाईल मध्ये शूट केला आणि बगळ्यांना मारणाऱ्या पोरांची याबाबत चौकशी केली. या मुलांनी मात्र उत्तर देण्यास टाळाटाळ केली. सयाजी शिंदे यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये काही मुलांनी बगळ्यांचा शिकार करून अतिशय क्रूरतेने पकडले आहे. हे सगळं पाहून सयाजी शिंदे यांना संताप आला

Share This News
error: Content is protected !!