Sara Ali khan

Sara Ali khan : बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानचा अपघात; व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

1092 0

मुंबई : सुपरस्टार सैफ अली खानची मुलगी आणि अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali khan) येत्या काळात दोन मोठ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. यामध्ये मर्डर मुबारक आणि ए वतन मेरे वतन या नावांचा समावेश आहे. सध्या सारा या सिनेमांच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मात्र यादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. सारा अली खानचा अपघात झाला असून ती जखमी झाली आहे. साराने व्हिडिओ शेअर करत याची माहिती दिली आहे.

नुकतंच सारा अली खानने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सारा तिच्या खास शैलीत चाहत्यांना अपघाताची माहिती देताना दिसत आहे. सारा अली खान सध्या एकाच वेळी दोन चित्रपटांचं प्रमोशन करत आहे. याच गोंधळात तिच्या पोटाला भाजलं आहे. मात्र हा अपघात तिच्यासोबत कसा झाला याबाबत सारा अली खानने कोणतीही माहिती दिलेली नाही.

सारा अली खानच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर ती आगामी चित्रपट ‘ए वतन मेरे वतन’ बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाची कथा 1942 च्या भारत छोडो आंदोलनावर आधारित आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यावर आधारित या सिनेमात सारा अली खान एका क्रांतिकारकेची भूमिका साकारणार आहे. तर ‘मर्डर मुबारक’ मध्ये सारा अली खान पंकज त्रिपाठी, करिष्मा कपूर, विजय वर्मा, संजयकपूर यांच्यासोबत झळकणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे, नरेंद्र मोदी एकत्र येणार? शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याचे मोठे वक्तव्य

Manoj Jarange : मनोज जरांगेंवर आणखी एक गुन्हा दाखल

Death threat to Navneet Rana : खासदार नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी

Loksabha Election 2024 : संभाजी राजे छत्रपतींची निवडणुकीतून माघार

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवड हादरलं ! ठाकरे गटाच्या ‘या’ विभागप्रमुखाच्या मुलाची निर्घृणपणे हत्या

Solapur News : कामावर जायला निघाला अन् मरणाच्या दाढेत गेला; मृत्यूचा थरारक Video आला समोर

Loksabha Elections 2024 : भाजप महाराष्ट्रातून किती जागा लढणार? संभाव्य यादी आली समोर

Crime News : ‘या’ भाजप आमदाराच्या पुतण्याची गोळ्या घालून हत्या

Pune Metro : आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोच्या तिसऱ्या मार्गाचे उदघाटन

Shivsena : शिवसेना महिला सेनेचे शिवदुर्गा महिला संमेलन 9 मार्चला होणार

Trikonasana : त्रिकोणासन करण्याचे काय आहेत अद्भुत फायदे ?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!