Sai Tamhankar

Sai Tamhankar : सई ताम्हणकर नागराज मंजुळेच्या ‘या’ वेबसिरीजमध्ये झळकणार

2501 0

मुंबई : बॉलिवूड, हिंदी सिनेसृष्टीला आपल्या अभिनयाची भुरळ पाडणारी मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आता पुन्हा एकदा हिंदीतील मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. सई ताम्हणकर आता नागराज मंजुळेच्या मटका किंग या वेब सिरीजमध्ये झळकणार आहे. अभिनेता विजय वर्मा हा लीड रोलमध्ये असणार आहे. काही महिन्यांपूर्वी अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने आपल्या आगामी प्रोजेक्ट्सची घोषणा केली होती. त्यात ‘मटका किंग’ची ही घोषणा करण्यात आली होती. हि वेब सिरीज ‘मटका किंग’ असलेल्या रतन खत्री याच्या आयुष्यावर आधारित आहे.

‘भक्षक’ या चित्रपटानंतर सई ताम्हणकर ही ‘अग्नी’, ‘ग्राउंड झिरो’, ‘डब्बा कार्टेल’, ”मटका किंग” सारख्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये झळकणार आहे. ”मटका किंग”चे शूटिंग काही दिवसांपूर्वी सुरू झाले आहे. विजय वर्मासह इतर बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी या वेब सीरिजमध्ये असणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे, संजय राऊतांना न्यायालयानं ठोठावला दंड

Share This News
error: Content is protected !!