रणबीर कपूरची मुख्य भूमिका असणारा ‘अॅनिमल’ चित्रपट (Animal Movie) सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत नवा रेकॉर्ड केला आहे. या चित्रपटाने जगभरात फक्त 3 दिवसांत 350 कोटींची कमाई केली आहे. चित्रपट रिलीज होऊन सहा दिवस झाल्यानंतरही चित्रपटगृबाहेर प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र काही लोकांना हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहणे शक्य नाही. त्यामुळे हे लोक हा चित्रपट OTT वर कधी रिलीज होणार याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
ओटीटीवर कधी होणार प्रदर्शित?
‘अॅनिमल’ चित्रपटाचं स्ट्रिमिंग ठरलेल्या एका पॅटर्नप्रमाणे केलं जाऊ शकतं. या पॅटर्नअंतर्गत हिंदी चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर 45 ते 60 दिवसांत कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्री केला जातो.1 डिसेंबरला प्रदर्शित झालेला ‘अॅनिमल’ सध्या जबरदस्त कामगिरी करत आहे. याच पॅटर्नअंतर्गत ‘अॅनिमल’ चित्रपट जानेवारीच्या पहिल्या किंवा तिसऱ्या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाऊ शकतो. या चित्रपटाचे ओटीटी हक्क नेटफ्लिक्सकडे आहेत.
संदीप रेड्डी वांगा यांनी या अॅनिमल या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात बॉबी देओल, रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, तृप्ती डिमरी या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच मराठमोळे अभिनेते उपेंद्र लिमये यांनी देखील एका सीनमध्ये काम केलं आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune News : आम आदमी पक्षाची “बसमित्र” संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी वाहतूक पोलिसांचा पुढाकार
Keral Suicide : ‘ती’ मागणी पूर्ण करता न आल्याने डॉक्टर तरुणीने उचलले ‘हे’ पाऊल
Vasai Crime News : खळबळजनक ! ‘त्या’ एका शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून 8 वर्षीय चिमुकलीची हत्या
Rupali Chakankar : राष्ट्रवादी कुणाची; रूपाली चाकणकरांनी दिलं ‘हे’ उत्तर
TV Actor Bhupinder Singh : खळबळजनक ! ‘या’ अभिनेत्याचा दिवसाढवळ्या एका कुटुंबावर गोळीबार; 1 जण ठार
Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एसटी बसचा भीषण अपघात
Lalit Patil Case : मोठी कारवाई ! ललित पाटील प्रकरणात ‘हे’ दोन पोलीस अधिकारी बडतर्फ
Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंची होणार चौकशी; फडणवीसांनी दिले आदेश
Travels on Fire : हज यात्रेला निघालेल्या ट्रॅव्हल्सला तासवडे टोलनाक्याजवळ लागली भीषण आग