मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री राखी सावतंच्या (Rakhi Sawant) अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. याचं कारण राखी सावंतला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. विभक्त पती आदिल खान दुर्रानी याने तिच्याविरोधात तक्रार दाखल केल्याने ही अटक होण्याची शक्यता आहे. राखी सावतंने खासगी आणि आक्षेपार्ह चित्रफिती सोशल मीडियावर शेअर केल्याचा आरोप आदिलकडून करण्यात आला आहे. आदिल खान दुर्रानीने तक्रार केल्यानंतर राखी सावंतने अटकेपासून सुरक्षा मिळवण्यासाठी दिंडोशी कोर्टात धाव घेतली होती. पण कोर्टाने राखी सावंतचा अटकपूर्व जामीन नाकारला होता.
अटकपूर्व जामीन अर्ज का फेटाळला?
दिंडोशी न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीकांत भोसले यांनी राखीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. राखीने कथितरित्या प्रसारित किंवा प्रसिद्ध केलेल्या चित्रफिती अश्लीलच नाहीत तर त्या आक्षेपार्हही आहेत. त्यामुळे प्रकरणातील तथ्ये, आरोप आणि परिस्थितीचा विचार करता राखी सावंतला अटकपूर्व जामीन मंजूर करणं योग्य नाही असं निरीक्षण नोंदवत कोर्टाने तिचा जामीन अर्ज फेटाळला होता.
या कलमांतर्गत होणार कारवाई?
राखीने बदनामीच्या हेतूने आमच्या खासगी चित्रफिती समाजमाध्यमांवरुन प्रसारित केल्या असा दावा करुन राखीचा विभक्त पती आदिल दुर्राणीने अंबोली पोलिसांत तक्रार दाखल केली होती. आदिलने राखीविरुद्ध अनेक कलमं लावली आहेत. ज्यामध्ये कलम 500 (मानहानी, 34 (सामान्य हेतू) आणि कलम 67A (इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये लैंगिक सुस्पष्ट सामग्री प्रकाशित करणे) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यामुळे आता राखी सावतंच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Beed Accident : ट्रक-पिकअपचा भीषण अपघात; 5 जणांचा जागीच मृत्यू
Prabha Atre Passed Away : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे निधन
Tata Group : मॅगीला टक्कर देण्यासाठी टाटा ‘या’ कंपनीची करणार खरेदी
Satara News : साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन
Bank Holiday : मकर संक्रांतीला बँक बंद की सुरु? जाणून घ्या बँकेच्या सुट्ट्यांची यादी
Sharad Mohol Murder : शरद मोहळ हत्याप्रकरणात ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर
Chhatrapati Sambhajinagar : उपचार सुरु असताना तरुणाला रॉडने मारहाण; घाटी रुग्णालयामधील घटना