अभिमानास्पद! ऑस्करमध्ये भारताचा डंका; ‘या’ श्रेणीत पटकावला पुरस्कार

746 0

लॉस एंजेलिसमधल्या डॉल्बी थिएटरमध्ये 95 वा ऑस्कर पुरस्कार सोहळापार पडला. ऑस्कर हा कलाविश्वातील अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो.

यंदाच्या अकादमी पुरस्कारांमध्ये भारताला प्रथमच तीन नामांकने मिळाली आहेत. यामध्ये एसएस राजामौली यांच्या RRR या सुपरहिट चित्रपटातील नाटू-नाटू या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठी नामांकन मिळाले आहे. तसेच ‘ऑल दॅट ब्रेथ्स’ ला सर्वोत्कृष्ट माहितीपट फीचर आणि ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ ला सर्वोत्कृष्ट लघु माहितीपटासाठी नामांकने मिळाली आहेत. त्यामुळे कोण पुरस्कार जिंकला याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं.

‘द एलिफंट व्हिस्पर्स’ला सर्वोत्कृष्ट लघु माहितीपट म्हणजेच बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ ही नेटफ्लिक्स डॉक्युमेंटरी आहे. त्यात सोडून दिलेला हत्ती आणि त्याची काळजी घेणारी व्यक्ती यांच्यातील अतूट बंधन दाखवण्यात आले आहे.

Share This News
error: Content is protected !!