‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं कौतुक

157 0

सध्या ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट चर्चेत आहे. हा चित्रपट 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

बॉक्स ऑफिसवर देखील हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला आणि कथानकला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चित्रपटाच्या टीमची भेटी घेतली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी चित्रपटाच्या टीमचं कौतुक केलं.

 

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे निर्माते अभिषेक अग्रवाल, विवेक रंजन अग्निहोत्री आणि अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे फोटो अभिषेख अग्रवाल यांनी ट्विटरवर शेअर केले आहे. फोटो शेअर करून अभिषेक यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून खूप आनंद झाला. त्यांनी आमच्या चित्रपटाचं कौतुक केलं. धन्यवाद मोदीजी.’ हे ट्वीट शेअर करून अभिषेख यांनी नरेंद्र मोदी यांना टॅग केलं आहे.

Share This News
error: Content is protected !!