PANKAJ DHEER DEATH: प्रसिद्ध चित्रपट आणि टीव्ही अभिनेते पंकज धीर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बी.आर. चोप्रा यांच्या गाजलेल्या ‘महाभारत’ (PANKAJ DHEER DEATH) मालिकेत त्यांनी कर्णाची अविस्मरणीय भूमिका साकारली होती, ज्यामुळे ते भारतीय घराघरात पोहोचले आणि प्रचंड लोकप्रिय झाले. गेल्या काही काळापासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा निकितन धीर आणि सून कृतिका सेंगर असा परिवार आहे. पंकज धीर यांच्या निधनाच्या या दुःखद बातमीने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
पंकज धीर यांचे जवळचे मित्र आणि अभिनेते अमित बहल यांनी त्यांच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंकज धीर यांना कर्करोग झाला होता. त्यांनी एकदा यावर (PANKAJ DHEER DEATH) यशस्वीरित्या मात देखील केली होती, परंतु दुर्दैवाने काही महिन्यांपूर्वी कर्करोग पुन्हा बळावला. उपचारादरम्यान त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती, मात्र कर्करोगाशी त्यांची ही झुंज अपयशी ठरली. पंकज धीर गेल्या काही दिवसांपासून खूपच आजारी होते, असे सांगण्यात येत आहे.
Aadivasi protest : बंजारा समाजाकडून आदिवासी आरक्षणाच्या दाव्याच्या निषेधार्थ पालघरमध्ये मोर्चा
पंकज धीर यांच्या कारकीर्दीबद्दल बोलायचं झाल्यास, त्यांनी चित्रपट आणि टीव्ही मालिका अशा दोन्ही माध्यमांमध्ये महत्त्वपूर्ण काम केले. त्यांच्या कारकिर्दीला मोठी कलाटणी देणारी भूमिका म्हणजे (PANKAJ DHEER DEATH) ‘महाभारत’ मालिकेतील ‘कर्ण’. या भूमिकेमुळे त्यांना तुफान लोकप्रियता मिळाली. याशिवाय, ‘चंद्रकांता’ या लोकप्रिय मालिकेत साकारलेल्या ‘शिवदत्त’ या त्यांच्या भूमिकेचेही विशेष कौतुक झाले होते. ‘बढो बहू’, ‘युग’, ‘द ग्रेट मराठा’ आणि ‘अजूनी’ यांसारख्या अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये त्यांनी काम केले.
BHANDARA ACCIDENT NEWS: लाखनी-भंडारा महामार्गावर भीषण अपघात टिप्परखाली दुचाकीस्वार ठार
टीव्ही मालिकांबरोबरच त्यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही आपला ठसा उमटवला. ‘सोल्जर’, ‘तुमको ना भूल पाएंगे’, ‘रिश्ते’, ‘अंदाज’, आणि ‘सडक’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी विविध भूमिका साकारल्या होत्या. आपल्या प्रभावी अभिनयामुळे आणि विशेषतः ‘कर्ण’च्या भूमिकेमुळे ते नेहमीच प्रेक्षकांच्या स्मरणात राहतील.