केदार शिंदे दिग्दर्शित आणि लिखित जत्रा या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राचं मनोरंजन केलं. या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, विजय चव्हाण, क्रांती रेडेकर यांच्यासोबतच कुशल बद्रिके, संजय खापरे यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या.
या चित्रपटातील गाणी ‘कोंबडी पळाली’ आणि ‘ये गं ये ये मैना’ तुफान गाजली होती. या चित्रपटाच्या उदंड यशानंतर आता नववर्षात ‘जत्रा 2’ सर्वांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे केदार शिंदेंकडून पोस्टर शेअर करण्यात आले आहे.
https://www.instagram.com/reel/Cb1eNn8LpLj/?utm_medium=copy_link