रुपेरी पडद्यावर धडकणार नितीन गडकरींचा जीवन प्रवास ; ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट

689 0

नितीन गडकरी… देशाच्या राजकारणातील एक मोठे नाव. भारतातील रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वाधिक काळ काम करणाऱ्या नितीन गडकरी यांची ओळख ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ अशीही आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जीवनावर आधारित लवकरच गडकरी या चित्रपट प्रदर्शित होणार असून नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटाचे कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केले आहे. अभिजीत मजुमदार प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे अक्षय अनंत देशमुख निर्माते आहेत. तर ‘गडकरी’मध्ये नितीन गडकरींची भूमिका कोण साकारेल? या प्रमुख भूमिकेत कोण पाहायला मिळेल यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली असून लवकरच याचा खुलासा होणार आहे.

नितीन गडकरींचा जीवन प्रवास अत्यंत प्रेरणादायी आणि रंजक असल्यामुळे राजकारणी म्हणून परिचीत असणाऱ्या या व्यक्तीमत्वाची वेगळी ओळख या चित्रपटातून केली जाईल, असा दावा निर्मात्यांनी केलाय. २७ ॲाक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे अनुराग भुसारी, मिहिर फाटे सहनिर्माते आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!