Top News Marathi Logo

“पैशांनी प्रेम विकत घेता येत…” नीना गुप्ता यांचं बोल्ड विधान

125 0

 

हिंदी चित्रपटसृष्टीतील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री नीना गुप्ता नेहमीच तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असते. गेल्या अनेक वर्षांपासून सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या नीनाने अनेकदा मनोरंजन विश्वापासून ते राजकारणापर्यंत विविध विषयांवर आपली मत ठाम मांडली आहेत.

नुकत्याच करीना कपूरच्या व्हॉट वुमन वॉंट या शोमध्ये नीना गुप्ता या गेस्ट म्हणून सहभागी झाल्या. यावेळी त्यांनी पैशांबाबत एक बोल्ड विधान केले आहे, ज्यामुळे सध्या सर्वत्र त्याची चर्चा रंगली आहे.

पैशांनी प्रेम विकत घेता येत

नीना गुप्ता म्हणाल्या,“मला नेहमी शिकवलं गेलं होतं की, पैशांनी सगळं विकत घेता येत नाही. पण मला आता कळलं की, पैशांनी तुम्ही सगळं विकत घेऊ शकता अगदी प्रेमसुद्धा! त्यामुळे मुलांना चुकीच्या गोष्टी शिकवू नका.” त्यांच्या या वक्तव्यामुळे सगळीकडे चर्चेला सुरुवात झाली आहे.

पुढे त्या असं ही म्हणाल्या “मी स्वतंत्र आहे, आणि स्वतःच्या मेहनतीने काम करून पैसे कमवते. माझा नवरा खूप चांगला आहे, तो माझ्यासाठी सर्व काही करतो, पण मला वाटतं की माझ्या बँकेत माझा पैसा असायला हवा. मी एफडी करते. यावर नवरा मला नेहमी म्हणतो, तुला एफडीची गरज नाही, पण एफडी केल्यामुळे मला मानसिक शांतता मिळते,” असं त्या म्हणाल्या. यावर करीना कपूरनेही नीना यांच्या या मतांशी सहमती दर्शवली.

नीना गुप्ता वैयक्तिक आयुष्यातही त्यांच्या विचारांसाठी ओळखल्या जातात.. नुकतच त्यांनी 1000 बेबीज वेबसिरीज मध्ये काम केलं होतं आणि त्यात त्यांच्या कामाचं अभिनयाचं कौतुकही झाल होत. तसच प्रेक्षकांची आवडती वेब सिरीज पंचायतच्या पुढील भागासाठीही त्या सज्ज झाल्या आहेत.

Share This News
error: Content is protected !!