Kantara 2 First Look

Kantara 2 First Look : ऋषभ शेट्टींच्या ‘कांतारा 2’चा फर्स्ट लूक व्हायरल

837 0

मुंबई : देशात सर्वाधिक कमाई करणाऱ्या ‘कांतारा’ या सिनेमाची जादू आजही प्रेक्षकांवर आहे. ऋषभ शेट्टी दिग्दर्शित आणि अभिनीत कांताराच्या दमदार यशानंतर ‘कांतारा 2’ ची (Kantara 2 First Look) घोषणा करण्यात आली आहे. कांतारा 2’ ची घोषणा केल्यापासून प्रेक्षकांना याची उत्सुकता लागून राहिली आहे. अखेर ‘कांतारा 2’ची पहिली झलक समोर आली आहे. ऋषभ शेट्टीनं नुकतंच ‘कांतारा : अ लेजेंड चॅप्टर 1’ ची पहिली झलक शेअर केली आहे. यामध्ये ऋषभ शेट्टीचा भयावय, रौद्र अवतार पाहायला मिळत आहे.

‘कांतारा 2’ हा कांताराचा प्रीक्वेल सिनेमा आहे. कांतारा आता एक वेगळ्या रुपात पाहायला मिळणार आहे. कांताराच्या जन्माची गोष्टी ‘कांतारा : अ लेजेंड चॅप्टर 1’ मध्ये पाहायला मिळणार आहे. सिनेमाचा फर्स्ट लुक समोर आल्याने चाहत्यांना आता या सिनेमाची उत्सुकता लागून राहिली आहे. कारण निर्मात्यांनी स्वत: त्याचं काऊंडाऊन सुरू केलं होतं. भूतकाळातील पवित्र प्रतिध्वनीमध्ये, जिथे प्रत्येक फ्रेममध्ये देवत्व भरलेलं आहे. न पाहिलेली एक झलक मिळविण्यासाठी संपर्कात रहा, असं म्हणत निर्मात्यांनी खास पोस्ट शेअर केली होती.

‘कांतारा’ हा सिनेमा साऊथ सिनेसृष्टीतील एक बोस्ट सिनेमा आहे. 2022 वर्षातील ब्लॉकबस्टर सिनेमा आहे. कांताराचा रेकॉर्ड आजवर कोणीच मोडू शकला नाहीये. ‘कांतारा’ची गोष्ट सर्वांनी पाहिली पण पण आता सिनेमाच्या पहिल्या पार्टची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सिनेमाच्या पहिल्या लुकमध्ये ऋषभ शेट्टी रौद्र अवतारात दिसत आहे. हा सिनेमा हिंदी, कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम, इंग्लिश आणि बंगली या 7 भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

National Constitution Day : 26 नोव्हेंबरलाच का साजरा करतात संविधान दिवस?

Delhi Crime : देश हादरला ! 350 रुपयांसाठी तरुणाची 60 वेळा चाकू भोसकून हत्या

Shivsena : ‘सगळी तयारी झालीये, 31 डिसेंबरला…’, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचे मोठे विधान

Asia Cup 2023 : आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा

Zero Balance Account : खात्यात पैसे नाहीत? नो टेन्शन आता झिरो बॅलन्स असतानाही बँक देणार पैसे

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!