मुंबई : यंदाच्या दिवळीत सगळ्यांनी मज्जा केलीच असेल पण ही दिवाळी आणखी मजेशीर करण्यासाठी ‘झिम्मा 2’ची (Jhimma 2 Trailer) टीम सज्ज झाली आहे. मनोरंजनाच्या सप्तरंगांची उधळण करण्यासाठी दिवाळीच्या दिवसात ‘झिम्मा 2’ हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या पहिल्या भागाने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्याचप्रमाणे बॉक्स ऑफिसवर देखील तगडी कमाई केली. त्यानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकदेखील याची आतुरतेने वाट पाहत आहेत.सध्या या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
या ट्रेलरमध्ये दमदार गॅंग रियूनियनसाठी एकत्र जमली असून सात जणींच्या सात तऱ्हा पुन्हा एकदा पाहायला मिळाल्या आहेत. ट्रेलरमध्ये प्रत्येकीच्या आयुष्याच्या कहाणीची थोडी झलक दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव आणि सिद्धार्थ चांदेकर या गेल्या भागातील कलाकारांसोबत आता रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे या दोघी देखील या तगड्या अभिनेत्री सिनेमात दिसणार आहे.
काय आहे ट्रेलरमध्ये?
ट्रेलरच्या सुरूवातीला पाहायला मिळतंय की निर्मिती सावंत आणि सुचित्रा बांदेकर विदेशातील रस्त्यावर कार चालवत असताना त्यांचा अपघात होतो आणि तोडक्या मोडक्या इंग्रजीमध्ये त्या तिथल्या पोलिसांशी बोलताना दिसत आहेत. ट्रेलर पुढेच सरकताच प्रत्येकीच्या आयुष्यातील एक एक कहाणी थोडी थोडी उलगडण्यात आली आहे. ट्रेलरच्या शेवट होण्याआधी सिनेमाची गोष्ट काही सेकंद तुम्हाला भावुक करते. तर ट्रेलरचा शेवट अभिनेत्री निर्मिती सावंत यांचा अभिनय आणि कॉमेडीच्या जबरदस्त टायमिंगनं झालेला आहे. “तुम जाओ इथरसे, हमको क्यू घाबरवते हो”, असे निर्मिती सावंत यांचे हिंदी डायलॉग प्रेक्षकांना खळखळून हसवताना दिसत आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.