आतुरता संपली !….सरसेनापती हंबीरराव “या” होणार प्रदर्शित पाहा टिझर

117 0

सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, आणि जबरदस्त आवाजाने आपल्या सगळ्याचे लक्ष वेधुन घेणारे अभिनेते प्रविण तरडे यांच्या अगामी चित्रपटाबद्दल नवीन बातमी समोर आली आहे. अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे यांच्या आगामी बहुचर्चित ‘सरसेनापती हंबीरराव’ हा भव्यदिव्य ऐतिहासिक चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची अतुरता प्रेक्षकांना लागून राहिली होती.

जगभरातील शिवप्रेमी या ऐतिहासिक मराठी चित्रपटाची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत. अखेर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे, 27 मे 2022 रोजी ‘सरसेनापती हंबीरराव’ हा बिगबजेट चित्रपट रुपेरी पडद्यावर झळकणार असून मे महिन्याच्या सुट्टीत दमदार संवाद, जबरदस्त ऍक्शनची मेजवानी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

https://www.instagram.com/p/CbEpNoapAyu/?utm_source=ig_web_copy_link

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा रक्त उसळवणारा टीझर प्रदर्शित झाला होता. त्याला जगभरातील प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. त्यातील संवाद आणि जबरदस्त ऍक्शन सिक्वेन्समुळे हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबाबत उत्कंठा वाढली होती. या चित्रपटात अभिनेता गश्मीर महाजनी हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन छत्रपतींच्या काळात स्वराज्याचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळालेले एकमेव सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची व्यक्तिरेखा स्वतः प्रविण तरडे साकारत आहेत. याशिवाय अनेक दिग्गज कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

Share This News

Related Post

Leopard Attack

Leopard Attack : बिबट्या कुत्र्याला घाबरुन पळाला; CCTV फुटेज आले समोर

Posted by - July 26, 2023 0
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून जंगली प्राण्यांचा वावर मानवी वस्तीकडे मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्राणी बेधडकपणे येऊन घरात शिरत असून…

मी भगवंत मान….शपथ घेतो की ; भगवंत मान यांनी घेतली पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ

Posted by - March 16, 2022 0
आम आदमी पार्टीचे भगवंत मान यांनी आज पंजाबच्या  25 व्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भगतसिंग यांचे पंजाबमधील वडिलोपार्जित गाव खटकर कलान…

दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्या ‘जुदा होके भी’चा ट्रेलर रिलीज (व्हिडिओ)

Posted by - June 25, 2022 0
बॉलिवूड- भयपंटाचा बादशाह अशी दिग्दर्शक विक्रम भट्ट यांचा नवा भयपट प्रेक्षकांच्या भेटीला लावल्करच येणार आहे. या भयपटाचे नाव आहे ‘जुदा…

महाराष्ट्र दिनानिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या पुण्यात ध्वजारोहण

Posted by - April 30, 2022 0
पुणे- महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 62 व्या वर्धापन दिन समारंभानिमित्त रविवारी 1 मे रोजी सकाळी 8 वाजता पोलीस संचलन मैदान, शिवाजीनगर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *