Satish Joshi

Satish Joshi : ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन

1063 0

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील एक दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन झालं आहे. रंगभूमीवरच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेते राजेश देशपांडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून याची माहिती दिली आहे. सतीश जोशी यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. रंगभूमीवर प्रेम करणाऱ्या या कलाकाराची स्टेजवरच एक्झिट झाली आहे.

काल रात्री 11 वाजता मध्यांदिन ब्राह्मण सभा येथे गिरगाव रंगभूमी वर एक छोटा प्रवेश सादर केला. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. यानंतर त्यांना तातडीने हरकिसन दास हॉस्पिटलला आणले. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अचनाक जाण्याने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.या घटनेनंतर मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांकडून सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली जात आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Lok Sabha : चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी ‘या’ दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!