दिग्दर्शक केदार शिंदे यांचं ‘झुंड’ विषयीचे ट्विट चर्चेत ; प्रेक्षकांना केलं झुंड पाहण्याचं आवाहन

199 0

नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड चित्रपट नुकताच 4 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला.

या सिनेमाच्या निमित्तानं अमिताभ बच्चन यांनी कोरोना महामारी नंतर तब्बल 2 वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे.

तसेच आमिर खान, धनुष, यासारख्या सुपरस्टार्सनंतर मराठी कलाकारांकडून झुंड सिनेमावर कौतुकाचा वर्षाव होतोय.

अनेक मराठमोळे सेलिब्रिटीसुध्दा सोशल मीडियावर झुंड सिनेमाविषयी व्यक्त होत आहेत. प्रसिध्द मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी झुंडविषयी केलेलं एक ट्विट सध्या बरंच चर्चेत आहे.

जात.. जात नाही तोवर माणूस म्हणवून घ्यायची आपली लायकी नाही. #झुंडसिनेमाम्हणूनपाहा असं ट्विट शिंदे यांनी केलं आहे.

Share This News
error: Content is protected !!