अभिनेत्री दीपिका पदुकोण रुग्णालयात , शूटिंग दरम्यान तब्येत बिघडली

428 0

हैद्राबाद – शूटिंगदरम्यान दीपिकाच्या हृदयाचे ठोके वाढल्याने तिची तब्येत बिघडली. यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र काही वेळातच असेही समजले की तिची तब्येत ठीक असून ती शूटींगवर परतली आहे. सध्या ती हैदराबादमध्ये अभिनेता प्रभाससोबत तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिका पदुकोणला हृदयाचे ठोके वाढण्याची तक्रार होऊ लागली, त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची हैदराबादच्या कामिनेनी हॉस्पिटलमध्ये तपासणी करण्यात आली. आता ती हॉटेलमध्ये आराम करत असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, मनोबाला विजयबालन यांनी ट्विटरवरुन सांगितले की, दीपिका आता पूर्णपणे बरी असून चित्रपटाच्या शूटिंगला परतली आहे. आतापर्यंत दीपिका किंवा दीपिकाच्या पीआर टीमने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

Share This News
error: Content is protected !!