Suhani Bhatnagar

Suhani Bhatnagar Death : ‘दंगल’ फेम ‘या’ अभिनेत्रीचे 19 व्या वर्षी निधन

623 0

मुंबई : मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आमिर खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट दंगलमध्ये बबीताची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुहानी भटनागर (Suhani Bhatnagar Death) हिचे निधन झाले आहे. तिने अवघ्या 19 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. तिने दंगल सिनेमात ज्युनीयर बबीता फोगट ची भूमिका साकारली होती. सुहानीच्या या आकस्मित निधनाने मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सुहानी गेल्या कित्येत दिवसांपासून आजारी होती. तिच्यावर एम्समध्ये उपचार सुरू होते. मात्र, ती उपचारांना काहीच प्रतिसाद देत नव्हती.अखेर आज तिची प्राणज्योत मालवली. सुहानीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. सुहानी तिच्या कुटुंबीयांसह फरिदाबाद येथे राहत होती. तिच्यावर अजरोंदा स्वर्ग आश्रममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

काही दिवसांपूर्वी तिचा एक अपघात झाला होता. त्यात तिचा पाय फ्रॅक्चर झाला होता. त्याच्या वर उपचार सुरू असताना तिला काही औषधे देण्यात आली होती. मात्र, याच औषधांच्या रिअ‍ॅक्शनमुळे तिच्या संपूर्ण शरीरात पाणी साचले. शरीरात पाणी भरल्यामुळं तिची प्रकृती बिघडली. त्यानंतर तिला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

सुहानीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने दंगल चित्रपटात आमिर खानची धाकटी मुलगी ज्युनिअर बबीता फोगाटची भूमिका साकारली होती. या चित्रपटाव्यतिरिक्त ती अनेक टिव्ही जाहिरातींमध्ये दिसून आली होती. मात्र, त्यानंतर तिनी सिनेक्षेत्रातून काही काळासाठी ब्रेक घेतला होता. व अभ्यासावर पूर्णपणे लक्ष्य केंद्रित केले होते. तिने तिच्या अनेक मुलाखतीतदेखील शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच चित्रपटात पुन्हा काम करेल, असं म्हटलं होतं.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

ISRO Naughty Boy INSAT-3DS : इस्रो आज रचणार इतिहास! अंतराळात पाठवणार ‘नॉटी बॉय’

Pune Manchar Accident : मंचर जवळ कार-टेम्पो-कंटेनरच्या भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

Sharad Mohol Murder : शरद मोहोळ प्रकरणात मोठी अपडेट; अखेर ‘त्या’ आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश

Ahmednagar News : कुटुंब हळहळलं ! वन रक्षक विभागाची लेखी परीक्षा उत्तीर्ण झाली, पण सरावादरम्यान घडली दुर्दैवी घटना

Share This News
error: Content is protected !!