अन्यआपला महाराष्ट्रमनोरंजन

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या गाडीला अपघात ; नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या गाडीचा मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर खोपोलीनजीक बोरघाटात अपघात झाला आहे.

बोरघाटात पाच-सहा वाहने एकमेकांना धडकली. यात मलायका अरोराच्या कारचादेखील समावेश होता.

राज ठाकरेंच्या सभेला जाणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने मलायका अरोराला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात मलायकाच्या डोक्याला दुखापत झाली आहे. सध्या नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.