बिग बॉस 18: पंतप्रधान मोदींच्या माजी बॉडीगार्डने शोसाठी दिला नकार

161 0

बिग बॉस हिंदीचं 18व पर्व सध्या बरंच चर्चेत आहे. या सिझनमध्ये अमेरिकन मॉडेल किम कार्दशियन वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणार असल्याच्या चर्चा रंगत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे माजी बॉडीगार्ड लकी यांनाही शोमध्ये सहभाग घेण्याची ऑफर दिली गेली होती. मात्र, लकी यांनी ही ऑफर नाकारली आहे.

लकी हे एक माजी स्नायपर आणि रॉ एजंट आहेत. सोशल मीडियावरही प्रचंड लोकप्रिय आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार,बिग बॉस 18साठी त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता. मात्र, त्यांनी याला स्पष्ट नकार दिला.

लकींच बिगबॉससाठी नकार देण्याच कारण

लकी यांनी याबाबत बोलताना सांगितलं, “रॉ एजंट असल्याने आमचं आयुष्य अत्यंत गोपनीय असतं. आमचं वैयक्तिक आयुष्य आणि ओळख लपवण्यासाठी आम्हाला विशेष ट्रेनिंग दिलं जातं, आणि मी त्याचं पालन करत असतो. लोक मला समजून घेत आहेत आणि समर्थन देत आहेत, याचा मला आनंद आहे.”

उत्तराखंडचे रहिवासी असलेल्या लकी यांनी बिग बॉसच्या टीमशी चर्चा करून हा शो न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या आयुष्यावर आधारित हिटमॅन: रिअल स्टोरी ऑफ एजंट लीमा या पुस्तकात त्यांची शौर्यगाथा मांडण्यात आली आहे. लवकरच त्यांच्यावर आधारित चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बिग बॉससाठी नकार देऊनही लकी यांची लोकप्रियता आणि त्यांचं साहसी आयुष्य पुन्हा चर्चेचा विषय ठरत आहे.

Share This News
error: Content is protected !!