छत्रपती संभाजीनगर : अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरावर हल्ला प्रकरणाचे छत्रपती संभाजीनगर कनेक्शन समोर आलं आहे. शहरातील जालानगरचा रहिवासी असलेला वस्ती मोहम्मद उर्फ वसीम चिकना याचा या घटनेत सहभाग होता. त्याच्यावर हल्ल्यासाठी लागणाऱ्या शस्त्रांची तस्करी करण्याची जबाबदारी देण्यात आली होती, अशी माहिती मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आली आहे. तर बिष्णोई गॅंगमधील असलेल्या लोकांसोबत तो सातत्याने संपर्कात असल्याचे समोर आले आहे.
काय घडले होते?
14 एप्रिलच्या पहाटे अभिनेता सलमान खानच्या घरावर अज्ञात लोकांनी गोळीबार केला होता. या घटनेत मुंबई पोलिसांनी वेगवेगळ्या भागातून सहा संशयितांना अटक केली. त्यावेळी केलेल्या तपासात सोनू सुभाष चंदर आणि अनुज थापण यांनी हल्लेखोरांना जवळपास 40 काडतुसह दिली होती. तर सागर पाल याला चार मॅगझिन आणि 40 काडतुसे दिली. त्यातल्याच पाच गोळ्या सलमान खानच्या घरावर झाडण्यात आल्या होत्या. हल्लेखोरांचं सलमान खानच्या फार्म हाऊसवर देखील हल्ला करण्याचं नियोजन होतं, अशी माहिती समोर आली. याप्रकरणात पनवेल पोलिसांनी वसीम चिकनासह, धनंजय सिंग, तापेसिंग, अजय कश्यप, गौरव भाटिया, इलियास नखवी, झिशान खान जावेद खान यांना अटक केली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune Crime News : धक्कादायक ! पुण्यात तरुण व्यावसायिकाची स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या
Mirzapur Season 3 Release: प्रतीक्षा संपली ! ‘मिर्झापूर सीझन 3’ ची रिलीज डेट जाहीर
T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकात सुपर 8 मध्ये ‘या’ संघाने केला प्रवेश
Sharad Pawar : मोदींच्या ‘भटकती आत्मा’ टीकेला शरद पवारांनी दिले सडेतोड प्रत्युत्तर
Viral Video : पेट्रल भरताना फोन वाजला अन् आगीचा भडका उडाला; CCTV फुटेज आलं समोर
IMD Monsoon Update : महाराष्ट्रावर दुहेरी संकट; हवामान खात्याने वर्तवला धडकी भरवणारा अंदाज
Manoj Jarange : उपोषणाचा चौथा दिवस ! जरांगे पाटलांची प्रकृती खालावली