बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची एक वेगळी जागा निर्माण केली आहे. त्यांची जादू अजूनही कायम आहे. त्यांचे बॉलिवूडमध्ये खूप मोठे योगदान आहे. माधुरी दीक्षितला ’54व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’मध्ये विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सोशल मीडियावर ही घोषणा केली आहे.
काय म्हणाले अनुराग ठाकूर?
”माधुरी दीक्षितने 4 दशकांपासून तिच्या प्रतिभेने मोठया पडद्याची शोभा वाढवली आहे. ‘निशा’ पासून ते मनमोहक ‘चंद्रमुखी’ पर्यंत, भव्य ‘बेगम पारा’ पासून अदम्य ‘रज्जो’ पर्यंत, त्यांनी अष्टपैलु अभिनय केला आहे.’ आज आम्हाला 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रतिभावान अभिनेत्रीला ‘भारतीय चित्रपटातील योगदानासाठी विशेष सन्मान’ पुरस्कार प्रदान करताना आनंद होत आहे.’ अशी घोषणा त्यांनी केली आहे.
आजपासून गोव्यात इफ्फीला सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमात बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार सहभागी होणार आहेत. माधुरी दीक्षितला मिळालेला हा सन्मान पाहून त्यांच्या चाहत्यांना मोठ्या प्रमाणात आनंद झाला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune News : पुणे हादरलं! मध्यरात्रीच्या सुमारास पाठलाग करून तरुणाची निर्घृणपणे हत्या
Wardha News : तपासणीसाठी आलेल्या मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्याचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू
Pune Accident News : गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पुण्यतील डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू