Breaking News

युक्रेन रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी धावला अभिनेता सोनू सूद

198 0

युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेलं युद्ध पाहता जग सध्या चिंतेत आहे. परिस्थितीची संवेदनशीलता लक्षात घेता, अनेकांना युद्धाच्या काळात देशात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची चिंता आहे. 

या मुलांना युद्धजन्य वातावरणातून बाहेर काढण्यासाठी सोनू सूद पुन्हा मदतीला धावला आहे. संवेदनशिल अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनू सूदने अनेक भारतीय विद्यार्थ्यांची सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी आणले.

याबद्दल सोनूने ट्विटमध्ये लिहिले की, ‘युक्रेनमधील आपल्या विद्यार्थ्यांसाठी कठीण काळ आणि कदाचित माझे आतापर्यंतचे सर्वात कठीण काम आहे. सुदैवाने, आम्ही अनेक विद्यार्थ्यांना सीमा ओलांडून सुरक्षित ठिकाणी जाण्यास मदत करू शकलो. चला प्रयत्न करत राहू. त्यांना आपली गरज आहे. असे त्याने म्हटले आहे.

Share This News
error: Content is protected !!