अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना बिझनेस आयडॉल पुरस्कार जाहीर

344 0

पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या वतीने देण्यात येणारा उत्कृष्ट व्यापारी, व्यापारी संघटना आणि बिझनेस आयडॉल पुरस्काराची आज पत्रकार परिषदेत घोषणा करण्यात आली. 25 मे रोजी, बुधवारी व्यापारी दिनानिमित्त आयोजित विशेष समारंभात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. यंदा पहिल्यांदाच बिझनेस आयडॉल पुरस्कार दिला जाणार असून प्रसिद्ध चित्रपट निर्माता, दिग्दर्शक व अभिनेता प्रवीण तरडे यांना तो जाहीर झाला आहे. तसेच आज का आनंद वृत्तपत्राचे संस्थापक संपादक श्याम अगरवाल यांना व्यापारी कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब अमराळे, विकास मुंदडा, अजित चंगेडिया, पुणे शहर अध्यक्ष सुनील गेहलोत व विजय नरेला, महिला विभाग शहराध्यक्ष शिल्पा भोसले व उपाध्यक्ष कुमार खत्री यांनी आज पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत व्यापार दिनानिमित्त होणारा समारंभ व पुरस्कार वितरण सोहळ्याची माहिती दिली.

व्यापारी दिनानिमित्त आयोजित हा पुरस्कार सन्मान सोहळा सातारा रस्त्यावरील अण्णाभाऊ साठे सभागृह येथे सकाळी 10 वाजता होणार आहे. याप्रसंगी कॅट संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल, प्रसिद्ध उद्योजक विठ्ठलशेठ मणियार, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, कॅट संघटनेचे राष्ट्रीय सचिव महेंद्र शहा, आयसीपीडीएफचे अध्यक्ष धैर्यशील पाटील, महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, विभागीय आयुक्त सौरभ राव आणि ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. हे सर्व मान्यवर व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या वतीने दरवर्षी 25 मे हा दिवस व्यापारी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी किरकोळ व्यापार क्षेत्रातील प्रामाणिकपणे व्यापार करणाऱ्या, ग्राहकांना उत्तम व दर्जेदार सेवा देणाऱ्या सात व्यापाऱ्यांना उत्कृष्ट व्यापारी पुरस्कार देण्यात येतो. आपल्याकडे सुमारे 350 प्रकारचे किरकोळ व्यापार आहेत. त्यातून उत्कृष्ट सात व्यापाऱ्यांची निवड या पुरस्कारासाठी केली जाते. या पुरस्काराचे यंदाचे हे सहावे वर्ष आहे. यावर्षी आणखी दोन पुरस्कार देण्यात येणार आहेत. व्यापाऱ्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून मदत करणाऱ्याचा व्यापारी कृतज्ञता पुरस्कार देऊन तर, उद्योग व व्यापारात उल्लेखणीय काम केलेल्यामधून एकास बिझनेस आयडॉल पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

कोरोनाचा संसर्ग आणि त्यामुळे लागू झालेल्या निर्बंधामुळे 2020 आणि 2021 या वर्षी व्यापारी दिन साजरा करता आला नाही. त्यामुळे उत्कृष्ट व्यापारी पुरस्काराचे वितरणदेखील झाले नाही. यावर्षी व्यापारी दिन साजरा करता येणार असल्याने मागच्या दोन वर्षाचे पुरस्कारही यावेळी देण्यात येणार आहेत.

 

जाहीर झालेले पुरस्कार 

उत्कृष्ट व्यापारी पुरस्कार 2020
संदिप डेअरी (दुध व दुग्ध पदार्थ उत्पादक) – दिलीप नाना चोरगे (भुकुम, मुळशी)
अरुण टिंबर (बांधकाम, टिंबर, पेंटींग, इलेट्रीक, हार्डवेअर) – अरुण जोरे (नसरापूर, भोर)
संतोष राखी (सिझनल व्यवसाय) – संतोष बोरा (भोरी आळी)
येवले चहा (चहा नाष्टा) – नवनाथ येवले (येवलेवाडी, पुणे)
सुहाना मसाले – आनंद चोरडीया (यवत, दौंड)
देशपांडे स्वयंपाक गृह (चपाती एक्सप्रेस) – निर्मल अनिल देशपांडे (धायरी, पुणे)
रिओ साबण – नचिकेत बागल (दत्तनगर, कात्रज)

उत्कृष्ट व्यापारी संघटना पुरस्कार 2020
कोथरूड व्यापारी संघटना

उत्कृष्ट व्यापारी पुरस्कार 2021
K MART (किराणा मॉल) – प्रमोद मोतीलाल दोषी (बारामती)
हिरा एजन्सी (बंन्टी फ्रुड्स प्रॉडक्ट ,डिस्ट्रिब्युटर उत्पादक) – विमलेश गांधी (आळे फाटा, जुन्नर)
आठवले फुड्स प्रॉडक्ट (नमकिन फराळ, खाद्य पदार्थ) – मैत्रेयी आठवले (सदाशिव पेठ, पुणे)
सरपाले फ्लॉवर मर्चंट (फुल डेकोरशन) – सुभाष सरपाले (फुलवाला चौक, गुरवार पेठ)
राज मसाले (मसाले पदार्थ) – महेंद्रकुमार गिरधारीलाल खाबीया (मारूंजी)
मातोश्री ट्रेडिंग कंपनी (किराणा हॉटेल) – किरण शिंदे (रांजणगाव, शिरूर)
केशरी चामुंडा माहीम हलवा भंडार (मिठाई सप्लाय) – जोरारामजी देवासी

उत्कृष्ट व्यापारी संघटना पुरस्कार 2021
शिरूर तालुका व्यापारी संघटना

उत्कृष्ट व्यापारी पुरस्कार 2022
प्रगती महिला औद्योगिक संस्था (संगिता ताई)
पुना गेस्ट हाऊस (मेस केटरिंग) – किशोर सरपोतदार (सिटी पोस्ट, सन्मान चौक, पुणे)
महादेव सेल्स पूर्वा ब्रँड – मोडाराम पकारामजी साळंकी (पिंपरी)
इंद्रायणी स्वीट्स (मिठाई दुकान) – पोलारामजी मोदीजी बोराना (भोसरी)
ब्रम्हा हॉटेल – महेंद्र वालीया (सिंहगड रस्ता)
टेकनी आर्ट हेअर स्टुडिओ (सलून व्यवसाय) – मनोज पंडित
मानसी मलाई गोळा, बर्फाचा गोळा – समिर चव्हाण/अनिल कडमडकर (बाजीराव रोड, पुणे)

उत्कृष्ट व्यापारी संघटना पुरस्कार 2022
अखिल केशवनगर व्यापारी संघटना

उत्कृष्ट व्यापारी कृतज्ञता पुरस्कार 2022
आज का आनंद समूह – शाम अगरवाल

बिझनेस मॅन आयडॉल 2022
प्रविण तरडे (अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक)

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!