जेष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंच्या निधनाची अफवा; कुटुंबीयांनीच दिली माहिती

1456 0

पुणे: मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले गेल्या 19 दिवसांपासून पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र, काल बुधवार सायंकाळपासून त्यांच्या निधनाच्या अफवा समाजमाध्यमांवर पसरल्या आहेत. काही माध्यमांमधील वृत्त आणि बॉलिवूडमधील अभिनेत्यांच्या ट्विटमुळे सोशल मीडियावर गोखले यांच्या प्रकृतीबाबत उलटसूलट चर्चा सुरू झाली होती.

मात्र गोखले यांच्या कुटुंबियांकडून ही चर्चा केवळ म्हणजे केवळ अफवा असल्याचं सांगितलं जातं असून रात्री उशिरा राज्य सरकारच्या वतीनं करण्यात आलेल्या एका ट्विटमुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

Share This News
error: Content is protected !!