नोकरीच्या शोधात आहात ? भारतीय मानक ब्युरो मध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! लवकर अर्ज करा…

508 0

मुंबई – भारतीय मानक ब्युरो (BIS) मध्ये 337 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी काम करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. 

अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 मे 2022 आहे. भारतीय मानक ब्युरोच्या अधिकृत वेबसाईटला अधिक माहितीसाठी भेट द्यावी. पदाचं नाव, शैक्षणिक पात्रता आणि पदानुसार उपलब्ध जागांची संख्या आदी माहिती या बातमीच्या माध्यमातून देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जदाराचं किमान वय 30 आणि कमाल वय 35 असणे आवश्यक आहे. ऑनलाईन परीक्षा, मुलाखत आणि टायपिंगची चाचणी अशा पद्धतीने रिक्त पदे भरण्यासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे

पदाचे नाव आणि उपलब्ध जागा

1) संचालक (कायदेशीर ) – 01 जागा

2) सहाय्यक संचालक (हिंदी) – 01 जागा

3) सहाय्यक संचालक (प्रशासन आणि वित्त ) – 01 जागा

4) सहाय्यक संचालक (विपणन) – 01 जागा

5) वैयक्तिक सहाय्यक – 28 जागा

6) सहाय्यक विभाग अधिकारी – ४७ जागा

7) सहाय्यक – ( संगणक- सहाय्यित डिझाईन ) – 2 जागा

8) लघुलेखक – 22 जागा

9) वरिष्ठ सचिवालय सहाय्यक – 100 जागा

10) कनिष्ठ सचिवालय सहाय्यक – 61 जागा

11) तांत्रिक सहाय्यक (प्रयोगशाळा) – 47 जागा

12) वरिष्ठ तंत्रज्ञ – 25 जागा

शैक्षणिक पात्रता

1) संचालक (कायदेशीर ) – हिंदी विषयात पदव्युत्तर शिक्षण

2) सहाय्यक संचालक (हिंदी) – LLB/ CA चा पाठपुरावा केलेला असावा

3) सहाय्यक संचालक (प्रशासन आणि वित्त ) – सामाजिक कार्यात पीजी / एमबीए

4) सहाय्यक संचालक (विपणन) – पदवीधर

5) वैयक्तिक सहाय्यक – पदवीधर

6) सहाय्यक विभाग अधिकारी – पदवीधर

7) सहाय्यक – ( संगणक- सहाय्यित डिझाईन ) – पदवीधर

8) लघुलेखक – पदवीधर

9) वरिष्ठ सचिवालय सहाय्यक – पदवीधर

10) कनिष्ठ सचिवालय सहाय्यक – पदवीधर

11) तांत्रिक सहाय्यक (प्रयोगशाळा) – संबंधित क्षेत्रात पदवी / डिप्लोमा

12) वरिष्ठ तंत्रज्ञ – ITI

वयाची अट – 30 ते 35 वर्षांपर्यंत, वेतन – 19,900/- ते 2,09,000, अर्ज शुल्क – जनरल / OBC/ EWS – 500/- (SC/ ST/ PwD – 150/- )

निवड पद्धती – ऑनलाईन परीक्षा, मुलाखत आणि टायपिंग चाचणी.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करायची शेवटची तारीख – 09 मे 2022

ऑनलाईन अर्ज करा –

https://www.bis.gov.in/index.php/career-opportunities/

अधिक माहितीसाठी –
https://drive.google.com/file/d/1udy0bNs0z6YBtJsX6KohM3MtSRzcFUeL/view

Share This News
error: Content is protected !!