मनी लॉण्डरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना गेल्या आठवड्यात अटक केली. त्यावेळी मलिक यांचे अंडरवर्ल्ड टोळीशी संबंध असल्याचे आणि दाऊद ची बहीण हसीना पारकरला 55 लाख रुपये देऊन टेरर फंडिंग केल्याचा आरोप ईडीने केला होता.
मात्र मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी अधिकाऱ्यांचा फर्जिवडा उघडकीस आला. मलिक यांनी 55 नव्हे तर 5 लाख रुपये दिल्याचे न्यायालयात सांगितले, तसेच आमच्याकडून टायपिंग मिस्टेक झाली असेही कबूल केले आहे. कुर्ला येथील जमीन खरेदी प्रकरणात मनी लॉण्डरिंग झाल्याच्या आरोपावरून ईडीने नवाब मलिक यांना अटक केली होती.
ईडीच्या वकिलांनी दिलेल्या स्पष्टीकरणावरून मलिक यांच्या वकिलांनी नाराजी व्यक्त केली.ईडी सारखी केंद्रीय तपास यंत्रणा अशा चुका कशा काय करू शकते? असा सवाल मलिक यांचे वकील अमित देसाई यांनी उपस्थित केला. मलिक यांच्यावर राजकीय सूड उगवण्यासाठी जुन प्रकरण मुद्दाम उकरून काढल जात असल्याचं आणि ईडीची कारवाई ही राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा देसाई यांनी युक्तिवाद करताना केला.