ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती गंभीर, मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु

380 0

मुंबई- बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. 86 वर्षीय धर्मेंद्र यांना एप्रिल महिन्यातदेखील त्यांच्या होम प्रॉडक्शनच्या अपने 2 या चित्रपटाच्या सेटवर पाठीच्या स्नायूंमध्ये त्रास झाल्यामुळे आयसीयूत दाखल करण्यात आले होते.

प्रकृती अस्वस्थामुळे मुंबईतील याच रुग्णालयात त्यांच्यावर उपचार झाले होते. प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी 1 मे रोजी सोशल मीडियावर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिले होते, ‘मित्रांनो, मी एक धडा शिकलो आहे’.

पुढे ते म्हणाले होते, “मित्रांनो, काहीही अति करू नका, मी केले आणि सहन केले. पाठीच्या स्नायूंमध्ये त्रास झाल्यामुळे मला हॉस्पिटलमध्ये जावे लागले, दोन-चार दिवस कठीण होते. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि देवाच्या आशीर्वादाने मी परत आलो आहे, काळजी करू नका मी आता खूप काळजी घेत आहे… लव्ह यू ऑल,” अशा आशयाचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला होता.

बराच काळ पडद्यापासून दूर राहिल्यानंतर धर्मेंद्र करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातून पुनरागमन करणार आहेत. आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्यासह या चित्रपटात जया बच्चन आणि शबाना आझमी यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट 10 फेब्रुवारी 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 11 मे रोजी धर्मेंद्र यांनी शबाना आझमी यांच्यासोबतचा सेटवरील एक फोटो शेअर केला होता.

Share This News

Related Post

#BOLLYWOOD : ‘इतके पैसे घेऊन काय उपयोग की पँटशिवाय बाहेर जावे लागते… ?’ पॅन्ट न घालताच शमिता शेट्टी पडली बाहेर आणि झाली तुफान ट्रोल

Posted by - February 10, 2023 0
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची धाकटी बहीण आणि ‘बिग बॉस 15’ फेम शमिता शेट्टी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने…

भीती नको परीक्षेकडे उत्साहानं पाहा – नरेंद्र मोदी

Posted by - April 1, 2022 0
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. ‘परीक्षा पे चर्चा’चा हा पाचवा…
Jawan Movie

Jawan Movie : बोंबला ! रिलीज होण्याच्या अगोदरच शाहरुखचा बहुचर्चित चित्रपट ‘जवान’चे क्लिप चोरीला

Posted by - August 12, 2023 0
शाहरुख खानचा आगामी ‘जवान’ हा चित्रपट (Jawan Movie) मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. ‘पठाण’ला मिळालेल्या यशानंतर आता चाहते त्याच्या ‘जवान’ चित्रपटाची…

अभिनेता आर माधवनच्या मुलाने पटकावले डॅनिश ओपन जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक

Posted by - April 18, 2022 0
मुंबई – अभिनेता आर. माधवनचा मुलगा वेदांत यानं डेन्मार्क येथील कोपहेगनमध्ये झालेल्या डॅनिश ओपन जलतरण स्पर्धा 2022 मध्ये सुवर्णपदक पटकावले…
Singham Again

Singham Again : ‘सिंघम अगेन’च्या शुटींग दरम्यान अजय देवगनचा अपघात

Posted by - December 4, 2023 0
मुंबई : सध्या बॉलीवूड अभिनेता अजय देवगन सध्या सिंघम अगेन (Singham Again) या सिनेमाच्या शुटींगमध्ये बिझी आहे. सिनेमाचं पहिलं पोस्टर्स…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *