मुंबई- बॉलिवूडमधील मोस्ट स्वीट कपल म्हणजे रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण. दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. दोघेही एकमेकांविषयी नेहमी विविध गोष्टींचा खुलासा सोशल मीडियावर करताना दिसतात. या दोघांच्या घरात लवकरच नवा पाहुणा येणार असल्याची बातमी समोर आली आहे.
रणवीर सिंह हा सध्या त्याच्या आगामी जयेशभाई जोरदार या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तो एका गुजराती व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. जो आपल्या जन्माला येणार असलेल्या मुलीसाठी लढताना दिसणार आहे.
अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान रणवीरला त्याच्या बाळाबद्दल तसेच नावाबद्दल विचारण्यात आले. ‘जर भविष्यात तुला आणि दीपिकाला मुलगी झाली तर तुम्ही तुमच्या मुलीचे नाव काय ठेवणार?’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना रणवीर म्हणाला, “मी बाळाच्या नावाची एक लांबलचक यादी तयार केली आहे. पण एवढ्यात मी ती नावं उघड करणार नाही”