Beed:

शेतात जाणाऱ्या रस्त्यावर दगड टाकल्याच्या कारणावरून महिलेला मारहाण, सासवडमधील घटना

560 0

सासवड- पुरंदर तालुक्यातील यादववाडीतून शेतात जाणाऱ्या रस्त्यावर दगड टाकल्याच्या कारणावरून महिलेला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी चौघांच्या विरोधात सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीचा व्हिडिओही समोर आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी सुभाष यादव, प्रकाश यादव, स्वानंद यादव आणि योगेश यादव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. या मारहाणीत अनिता यादव, अनिता यादव यांचा मुलगा सुशांत आणि मुलगी रविना जखमी झाल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यादववाडीतून जाणाऱ्या रस्त्यावर अनिता यादव यांनी रस्ता अडवण्याच्या उद्देशाने दगड टाकले होते. हे दगड टाकल्याने रस्त्यामध्ये अडथळा येत होता. त्यामुळे या रस्त्याने ये-जा करणाऱ्यांचा यादव कुटुंबावर राग होता. रविवारी 15 तारखेला संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास आरोपींनी पीडितांना हाताने, लाथा बुक्क्यांनी, लोखंडी रॉडने मारहाण केली तसेच महिलेची साडी ओढून लज्जा उत्पन्न होईल अशाप्रकारचे घृणास्पद वर्तन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर मुलगी रविनाने तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तक्रार दाखल करून आरोपींना अटक केली.

आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Share This News
error: Content is protected !!