कैलास स्मशानभूमी जळीत प्रकरणात भाजलेल्या एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

553 0

पुणे- अंत्यविधीच्या चितेवर रॉकेल टाकताना भडका उडल्याने कैलास स्मशानभूमीतील घटनेत ११ जण जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असताना एकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी आगीचा भडका उडवून लोकांना जखमी करण्यास कारणीभूत ठरलेल्या एकाला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे.

गणेश सर्जेराव रणसिंग (वय ४९, रा. दत्तविहार, आव्हाळवाडी, वडजाई, वाघोली) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेत रॉकेलची कॅन ज्याच्या ताब्यात होती ते अनिल बसन्ना शिंदे (वय ५३, रा. ताडीवाला रोड) यांचे उपचार सुरु असताना निधन झाले आहे.

याबाबत प्रतिक दीपक कांबळे (वय २४, रा. महात्मा फुले वसाहत, ताडीवाला रोड) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे., दीपक कांबळे यांच्यावर वडिलांवर कैलास स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येत होते. चितेस अग्नी देण्यात आला होता. त्यापासून काही अंतरावर महिला व पुरुष बसले होते. गणेश रणसिंग याने अनिल शिंदे याच्याकडील रॉकेलचा कॅन घेतला व कॅनमधील रॉकेल अग्नी दिलेल्या चितेवर ओतू लागला. तेव्हा भडका उडाल्याने त्याच्या हातातील कॅन पेटला. त्यामुळे त्याने पेटलेला कॅन जोरात फेकला. तो बाजूला बसलेल्या नातेवाईकांच्या अंगावर पडून त्यात ११ जण भाजले.

या सर्वांवर ससून व खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. उपचार सुरु असताना अनिल शिंदे यांचा २ मे राेजी मृत्यू झाला. आणखी दोघा जणांची प्रकृती गंभीर आहे. सहायक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव तपास करीत आहेत.

Share This News
error: Content is protected !!