काजू खाण्याचे काय आहेत फायदे आणि तोटे ?

516 0

काजू हे सगळ्यांचे आवडते ड्रायफ्रुट आहे. शिरा असो किंवा खीर, काजू घातल्याशिवाय गोड पदार्थ अपूर्णच वाटतो. काजू शरीराला अतिशय पोषक आहेत. काय आहेत काजू खाण्याचे फायदे आणि तोटे ? जाणून घ्या.

काजूच्या नियमित सेवनाचे फायदे

– काजू हे आपल्या शरीराला अनेक पोषक घटक पुरवत असते. काजूचे नियमित सेवन केल्याने हृदय तंदुरुस्त राहण्यास मदत होते. काजूमध्ये बायो ऍक्टिव्ह मायक्रोन्यूट्रिएंट नावाचा घटक असतो, हा घटक आपले हृदय तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतो. म्हणून अनेक आहारतज्ञ काजूचे सेवन करण्याचा आपणास सल्ला देतात.

– असे सांगितले जाते की काजूची नियमित सेवन केल्याने कॅन्सर सारख्या महाभयंकर आजारापासून वाचले जाऊ शकते. असे सांगितले जाते की काजूमध्ये एनाकार्डीक ऍसिड आढळते हा घटक आपल्या शरीरात कॅन्सरचा फैलाव होण्यापासून बचाव करते.

– काजूमध्ये साखरेचे प्रमाण कमी असते. पोषक आहारात काजूचा समावेश केला जातो. काजूमध्ये झिंक, प्रथिने, फायबर यासारखे पोषक घटक असतात. काजूच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि बुद्धीच्या विकासासाठी सुद्धा काजू अतिशय उपयुक्त ठरतात. काजूमध्ये ल्युटीन आणि झेंथीन हे घटक असतात. त्यामुळे डोळ्यांचे पडदे सुरक्षित राहून डोळे निरोगी राहण्यास मदत होते .

– काजू मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात. काजूमध्ये कार्बोहायड्रेट प्रमाण कमी असते. काजू रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते.

– काजूमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे पोषक घटक भरपूर प्रमाणात आढळतात. त्यामुळे गर्भवती महिलांनी याचे सेवन केल्यास त्यांच्या आरोग्यासाठी उत्तम राहते. काजूमध्ये कॅल्शियम असल्याने याचे सेवन केल्यास गर्भवती महिलांना याचा फायदा होतो तसेच येणाऱ्या बाळाला देखील याचा फायदा होतो बाळाची हाडे यामुळे मजबूत होतात.

काजू सेवनाचे तोटे

-काजुमध्ये अधिक मात्रेत सोडियम आढळतो आणि म्हणून जर आपण प्रमाणापेक्षा जास्त काजूचे सेवन केले तर आपल्या शरीरात सोडियमचे प्रमाण हे अनावश्यक रित्या वाढू शकते. त्यामुळे हाय ब्लड प्रेशर, स्ट्रोक तसेच हृदयाशी संबंधित आजार अशा समस्या होऊ शकतात.

-काजूमध्ये अधिक प्रमाणात कॅलरीज असतात आणि त्या आपल्या शरीराचे वजन वाढविण्यास कारणीभूत ठरतात.तसे बघायला गेले तर त्याला आपल्या शरीरासाठी चांगले असतात पण जास्त कॅलरीज आपल्या शरीराचे वजन वाढवु शकतात म्हणून काजूचे प्रमाणात सेवन करणे महत्त्वाचे ठरते.

-काजू मध्ये फायबर देखील आढळतो वास्तविक बघायला गेले तर फायबर आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतो पण जर जास्त प्रमाणात फायबर शरीरात झाला तर त्यामुळे गॅसेसच्या समस्या तयार होतात आणि यामुळे पोटाचे विकार वाढू शकतात.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!