या आहेत ट्रिक्स ज्याच्या साह्याने होऊ शकते तुमच्या कॉलचे रेकॉर्डिंग

407 0

नवी दिल्ली- गुगलने काही दिवसांपूर्वीच आपल्या प्लॅटफॉर्मवरील सर्व कॉल रेकॉर्डिंग अ‍ॅप्सला बंद केले आहे. जर तुमच्या फोनमध्ये गुगल डायलर असल्यास, तुम्हाला कॉल रेकॉर्डिंगचा पर्याय मिळणार नाही. मात्र, काही ट्रिक्सच्या मदतीने कोणीही तुमच्या कॉलला रेकॉर्ड करू शकते. अशाच काही महत्त्वाच्या टिप्स जाणून घेऊयात.

अनेकजण कॉलवरील महत्त्वाचे संवाद रेकॉर्ड करून ठेवत असतात, जेणेकरून भविष्यात त्याचा उपयोग होईल. जर तुम्हाला तुमचा कॉल रेकॉर्ड होत आहे, असे वाटत असल्यास या महत्वाच्या ट्रिक्स द्वारे तुम्ही हे त्वरित ओळखू शकता.

वारंवार Beep चा आवाज येणे

बहुतांश मोबाइल फोन मॅन्यूफॅक्चरर आपल्या डिव्हाइसमध्ये बीप साउंड देतात. यामुळे कोणीही तुमचा कॉल रेकॉर्ड करत असल्यास, वारंवार बीप टोन वाजते. जर एखाद्याशी फोनवर बोलताना तुम्हाला अनेकदा हा आवाज ऐकू येत असेल, तर समजून जा की तुमचा कॉल रेकॉर्ड केला जात आहे. मात्र, हे फीचर सर्वच फोन्समध्ये काम करत नाही.

जोरात Beep साउंड

अनेकदा यूजर्सला सिंगल बीप साउंड देखील ऐकू येतो. परंतु, असे खूप कमी वेळा होते. एखादी व्यक्तीने कॉल रेकॉर्ड करण्यास सुरुवात केल्यानंतर दुसऱ्या यूजरला सिंगल बीप साउंड ऐकू येतो. हा आवाज कॉल रेकॉर्डिंग सुरू झाल्याचे संकेत आहे. हे फीचर जास्त करून फीचर फोन्समध्ये पाहायला मिळते.

अनेकजण कॉलला स्पीकरवर ठेवून देखील रेकॉर्ड करतात. कॉल स्पीकरवर ठेवून इतर फोन्समध्ये रेकॉर्ड करण्यासाठी थर्ड पार्टी अ‍ॅपची देखील गरज नसते.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!