Pratibha Dhanorkar

Pratibha Dhanorkar : चर्चेतला चेहरा : प्रतिभा धानोरकर

527 0

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केलीय. या यादीत राजस्थानच्या 2 आणि महाराष्ट्राच्या एका लोकसभेच्या जागेसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली. राज्यातील काँग्रेसची ही तिसरी यादी असून यात चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली.

वरोऱ्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर या चंद्रपूर लोकसभेसाठी नैसर्गिक उमेदवार मानल्या जात होत्या परंतु चंद्रपूरमधून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार यांच्या उमेदवारीसाठी पक्षाकडे आग्रह धरला होता. त्यामुळे या जागेबाबत पक्षपातळीवरील तिढा निर्माण झाला होता. नंतर या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध देखील बघावयास मिळाले.

या परिस्थितीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी विजय वडेट्टीवार यांना स्वत: लढण्यास सूचना केली मात्र वडेट्टीवार स्वत: न लढता मुलीसाठी आग्रही होते. त्यामुळे अखेर पक्षश्रेष्ठींनी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर केली. हा मतदारसंघ चंद्रपूर, वणी आणि आर्वी असा विस्तारला आहे. चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याचा यात समावेश असून दिवंगत बाळू धानोरकर यांनी 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसला ही जागा जिंकून दिली होती.आता बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर या हा गड राखण्यात यशस्वी होतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Share This News
error: Content is protected !!