नगरसेवक ते राज्यसभा खासदार; कसा आहे वंदना चव्हाण यांचा जीवनप्रवास

432 0

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शांत, संयमी,अभ्यासू चेहरा अशी ओळख असलेल्या राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांचा आज वाढदिवस. आता पर्यंत वंदना चव्हाण यांचा जीवनप्रवास कसा राहिलाय हे सांगणारा हा खास लेख

कोण आहेत वंदना चव्हाण ?

वंदना चव्हाण यांचा जन्म 6 जुलै 1961 रोजी पुण्यात झाला. त्यांचे बालपण पुण्यातच गेले. वंदना चव्हाण यांचे वडील विजयराव मोहिते हे नावाजलेले वकील होते. वंदना चव्हाण यांचे पती हेमंत चव्हाण देखील मोठे वकील आहेत. आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे वकिलीची प्रॅक्टीस सुरू केली होती. वंदना चव्हाण या काही काळ ऑल इंडिया काऊंसिल ऑफ मेयर्सच्या वाइस चेअरपर्सन राहिल्या आहेत. त्यांनी लॉ ऑफ क्रुएल्टी, एबेटमेंट ऑफ सुसाइड और डॉवरी डेथ या पुस्तकांचे लेखनही केले आहे.

वंदना चव्हाण यांचा राजकीय प्रवास

वंदना चव्हाण या नगरसेवकपदापासून महापौर, आमदार, खासदार असा प्रवास करत संसदेत पोहोचल्या आहेत. वडील विजयराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली सुरु असताना काँग्रेसच्या नेत्यांनी वंदना चव्हाण यांना महापालिका निवडणूक लढवण्याचा आग्रह केला. विशेष म्हणजे पहिल्याच फटक्यात वंदना चव्हाण नगरसेवक म्हणून निवडून आल्या. त्यानंतर पुन्हा निवडून येऊन 1997-98 साली त्या पुण्याच्या महापौर होत्या

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर वंदना चव्हाण शरद पवार यांच्यासोबत काँग्रेसमधून बाहेर पडल्या. राज्यात आघाडीचे सरकार असताना वंदना चव्हाण यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून संधी मिळाली. त्यांनी पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष म्हणून काम केले. पुणे महापालिकेची 2012 आणि 2017 ची निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आल्या होत्या. तत्पूर्वी त्यांनी पर्वतीमधून विधानसभेची निवडणूक लढविली होती.

स्वच्छ प्रतिमा आणि सर्व प्रकारच्या वादापासून दूर राहिलेल्या वंदना चव्हाण यांना 2012 साली राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेवर पाठवण्यात आले. या काळात वंदना चव्हाण यांनी संसदेत पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा केला. याच कामगिरीच्या जोरावर वंदना चव्हाण यांना 2018 साली राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा राज्यसभेवर पाठवले होते.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!